mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लग्‍नाच्या आमिषाने सोलापूरच्या महिला पोलिसावर बलात्कार; महाराष्ट्र सुरक्षा गार्डसह तिघांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 24, 2021
in क्राईम, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लग्‍नाचे आमिष दाखवून एका महिला पोलिसावर बार्शी रोड, अक्कलकोट रोड आणि तुळजापूर येथील लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आला. प्रेमसंबंधातून महिला पोलिस हिला दिवस गेल्यानंतर लग्‍नाआधी मूल नको म्हणून गर्भपात केला. त्यानंतर लग्‍नास नकार दिला. लग्‍नाचे आमिष देऊन बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिला पोलिसांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या गार्डसह त्याची बहीण आणि भाऊजीवर
गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश अर्जुन पाखरे (रा. पेनूर, ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलातील गार्डचे नाव आहे तसेच गणेश याची बहीण प्रियंका आणि भावजी उमेश राजगुरू यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित महिला पोलिस नाईक या ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. 2018 मध्ये त्या गणपती विसर्जनाच्या ड्युटीवर होत्या. त्यावेळी कामती पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत अशोक शेंबडे (रा.पेनूर, ता.मोहोळ) यांची ओळख झाली.

एप्रिल 2019 मध्ये चंद्रकांत याने त्याचा मित्र गणेश पाखरे याची ओळख करून दिली. ओळखीनंतर गणेश याने त्याचा मोबाईल नंबर दिला तसेच पीडित महिला पोलिस नाईक यांचा मोबाईल नंबर घेतला. सुरूवातीच्या काळामध्ये गणेश आणि पीडिता यांची मैत्री झाली.

कालांतराने गणेश याच्याबरोबर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर गणेश याने महिला पोलिसास लग्‍नाचे आमिष दाखवून 1 जुलै 2020 ते 1 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत शहरातील खतीबनगर, अक्कलकोट रोड, मार्च व एप्रिल 2021 मध्ये तुळजापूर तालुक्यातील शिवनेरी लॉज, बार्शी रोडवरील दर्शन लॉज आणि सुप्रजा लॉज याठिकाणी नेऊन वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला.

त्यातून गर्भवती झाल्यानंतर लग्‍नाअगोदर मुल नको म्हणून आरोपी गणेश याची बहीण प्रियंका राजगुरू व तिचा पती उमेश राजगुरू यांनी जबरदस्तीने गर्भपात केला. पण त्यानंतर लग्‍न करण्याबाबत टाळाटाळ केली.

यामुळे पीडित महिला पोलिस नाईक हिने एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय मोरे हे करत आहेत.

संबंध अन् गर्भपातासाठी प्रेम तर लग्नासाठी मात्र टाळाटाळ

आरोपीच्या बलात्कार प्रकरणाने फिर्यादी महिला गर्भवती राहिली. यावेळी गणेश याची बहीण प्रियांका राजगुरू व तिचा पती उमेश राजगुरू यांनी तिला प्रेमाने समजावून लग्‍नाआधी मूल नको, तू गर्भपात करून घे, त्यानंतर लागलीच तुमचे लग्‍न लाऊन देतो, असे सांगून डफरीन चौकातील बनशंकरी हॉस्पिटल येथे गर्भपात केला.

गर्भपात झाल्यानंतर गणेश याने महिला पोलिसाचा फोन उचलण्याचे बंद केलेच पण तिला समजावणारे प्रियांका व उमेश यांनीही तिला प्रतिसाद दिला नाही.

सोलापुरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तर एका 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण

सोलापुरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तर एका 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. समाधाननगर, अक्कलकोट रोड येथे राहणार्‍या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 22 जून रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्‍तीने फूस लावून तिचे अपहरण केले. अशा आशयाची फिर्याद त्या अल्पवयीन मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली. यानुसार अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. .

तर लक्ष्मीनगरात राहणारा साकीब-हसन हा पहिलीत शिक्षण घेतो. सध्या शाळा बंद असल्याने तो घरीच असतो.

22 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साकीब-हसन व त्याची बहीण हे दोघे बिस्किट घेण्यासाठी गल्लीतील सय्यद किराणा दुकानात गेले. त्यानंतर त्याची बहीण एकटीच घरी आली. आईने साकीब-हसन कोठे आहे? असे विचारले असता तिने सांगितले की, साकीब हा घराजवळ आल्यावर मैदानाकडे खेळण्यास जातो म्हणून गेला आहे.

त्यानंतर 6 वर्षाच्या साकीब-हसन याचा त्याच्या आई-वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पेटकर हे करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

सोलापूर ब्रेकिंग! वाळू उपसा करणार्‍या 6 बोटी नष्ट; २० ब्रास वाळू जप्त

ताज्या बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा