टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात गुटखा राजरोसपणे विकला जात आहे. मात्र, असे असताना अन्न व औषध प्रशासन मूग गिळून गप्प आहे. गुटखा विक्रीचा विळखा वाढला आहे. त्यात गुटखा पुरवठा करणाऱ्या या मोठ्या माशांनाच जाळ्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मंगळवेढा तालुक्यात गुटख्याच्या पाठोपाठ आता माव्यातूनही लाखोंची उलाढाल होत आहे. माव्यातून अनेकांना रोजगार निर्माण झाला असला, तरी शासनाने गुटखा व मावा विक्रीवर बंदी लागू केली.
मात्र, तालुक्यात या बंदीच्या निर्णयाचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. गुटखा प्रकरणाचा चटका काही पोलिस अधिकाऱ्यांनादेखील बसला आहे. गुटखा कारवाईतील वाहन सोडून दिल्याप्रकरणी दोन ते तीन पोलिस अधिकारी निलंबित झाले आहेत.
गुटख्याचे व्यसन नव्याने निर्माण होणारा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. साधारणपणे कॉलेजच्या मुलांमध्ये गुटख्याचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तालुक्यात सध्या रस्त्यालगत, शहराच्या चौकात व प्रमुख रस्त्यांवर व किराणा दुकाने,
तसेच महामार्गावर, पानटपरीचालक छुप्या पद्धतीने गुटखा व मावा विक्री करतात. गुटखाबंदी असल्याने अचानक माव्याला मोठी मागणी वाढली. मात्र, २०१३ मध्ये माव्यावरही बंदी आणली. सुरुवातीच्या काळात छुप्या पद्धतीने विक्री सुरू राहिली.
मात्र, या बंदीचा काहीच परिणाम झाला नाही. ही बंदी फक्त कागदवरच राहिली. त्यामुळे गुटखा व मावा विक्री दुकानदारांनी आता खुलेआम गुटखा विक्री सुरू केली आहे. कारवाईच्या नावाने बोंबाबोंब झालेली आहे.
पहाटे मोटारसायकल किंवा अन्य वाहनांनी पंटरच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक केली जाते. गुटखा विक्रेत्यांची मनमानी वाढल्याने सामान्य माणूस उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नाही. गुटखा विक्रीचा प्रश्न अनेकांना सतावत आहे. प्रत्यक्षात मावा किंवा गुटखा हा शरीराला घातकच आहे.
मात्र, यात भर म्हणून या माव्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची भेसळ शरीरास अतिघातक ठरत आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचा चुना वापरला जातो. त्यामुळे तरुणांत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मावा खाणाऱ्याला जेवणात तिखट भाजी खाणे त्रासदायक ठरते. तोंड स्वछ करण्यासाठी दातांच्या दवाखान्याचा खर्च वाढतो.
तसेच जिभेला, गालाला जखमा झाल्याचे अनेकजण बोलून दाखवित आहेत. अन्न औषध प्रशासन विभागात अधिकारी हे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना पाठीशी घालत असतील तर राज्यात गुटखाबंदी फक्त कागदावरच राहणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
शहरासह तालुक्यात गुटखा खुलेआम विक्री सुरू आहे. तरुण पिढी गुटख्याच्या आहारी गेली असून कर्करोगाला अनेकजण बळी पडले आहेत. गुटखा विक्रीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याबद्दल सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मंगळवेढा व सांगोल्यात बडे विक्रते
सांगोलासह मंगळवेढा तालुक्यात मरवडे, ब्रम्हपुरी, बोराळे आदी ठिकाणी बडे विक्रेते असल्याचे बोलले जात आहे.सांगोला मधील एक जण व इथले काही जण तालुक्याला गुटखा पुरवठा करत असल्याचे बोलले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज