टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने काल मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या आठवड्याच्या शेवटी मुंबईत अवकाळी पावसाची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील वातावरण बिघडले आहे. येत्या 24 तासांत देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
याशिवाय मुंबईत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह (ताशी 30 ते 40 किमी) पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. शक्यता आहे.
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या आकडेवारीनुसार, पूर्वेकडील वारे पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल.
दरम्यान, 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज 24 नोव्हेंबरलाही ढगाळ वातावरण राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात चांगला पाऊस होऊ शकतो.
27 नोव्हेंबरला पाऊस कमी होऊ शकतो. बुधवारी मुंबईचा हवेचा दर्जा निर्देशांक 122 होता, जो ‘मध्यम’ श्रेणीचा आहे. यापूर्वी 9 नोव्हेंबरला मुलुंड, मालाड आणि गोरेगाव कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला होता.
महाराष्ट्रातील ‘या’ भागातील पावसाची स्थिती
रत्नागिरी जिल्ह्याला आजपासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोलापूर, नागपूर जिल्ह्यात पुढील चार दिवस आकाश आंशिक ढगाळ आणि हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ५ दिवसादरम्यान, कमाल तापमान 31.9 ते 32.4 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 16.6 ते 17.0 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील पुढील पाच दिवस आंशिक ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज