टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात तसेच सांगोला तालुक्यात सोलापूर येथील अन्न व भेसळ विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून दुधाचे नमुने घेतल्याने दुध डेअरी चालकांमधून मोठी खळबळ उडाली असून भेसळ करणार्यांनी या पथकाचा धसका घेतला आहे.
दरम्यान, नागरिकांना विनाभेसळचे दुध मिळावे यासाठी यापुढेही अधुनमधून धाडसत्र राबविण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
राज्यात मोठया प्रमाणात दुधामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर ही भेसळ रोखण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
दुधातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना स्वच्छ व गुणवत्तापूर्वक दुधाचा पुरवठा होण्यासाठी या कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
मंगळवेढा शहरात दि.4 रोजी श्रीराम मिल्क कलेक्शन सेंटर,होनमाने गल्ली,मायाक्का मिल्क प्रोडक्ट सांगोला नाका,विजया महिला दुध संघ,गुंजेगांव,हिरीजेट फुडस, आंधळगांव,हटसन दुध डेअरी संकलन केंद्र बोराळे आदी ठिकाणी छापे टाकण्यात येवून येथील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
तसेच सांगोला तालुक्यातील अग्रणी मिल्क अँड मिल्क प्रोसेस,राजापूर पाटी,सुपर सुर्योदय अॅग्रो अँड मिल्क इंडस्ट्रीज प्रा.लि.मेडसिंगी,व्हीआरएस फुडस एलटीडी पारस मेडसिंगी आदी ठिकाणचेही दूधभेसऴचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान या कारवाई मोहिमेत जिल्हा दुध विकास अधिकारी डॉ.मिलाक्षणी जगताप,अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, केमिस्ट अधिकारी सुरेश सरडे,सहाय्यक अमोल गुंडेस्वार व इतर अधिकारी यांचा समावेश होता.
दरम्यान, मंगळवेढयात म्हशीच्या दुधात जर्सी गाईच्या दुधाची भेसळ करून ती ग्राहकांना प्रती 70 रुपये लिटर दराने विक्री करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या हाेत्या.
जर्सी गाईचे दुध मिक्स केल्यामुळे म्हशीच्या दुधाचा रंग बदलून तो पिवळसर दिसून येत असल्याच्या गृहिणींच्या याबाबत तक्रारी आहेत. म्हशीच्या दुधाला फॅटप्रमाणे 60 रुपये प्रतिलिटर तर जर्सी गाईच्या दुधाला 34 रुपये प्रति लिटर असा दर मिळत आहे.
दुध डेअरी चालक जादा पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी कमी दराचे जर्सी गाईचे दुध म्हशीच्या दुधात मिसळून ग्राहकांना फसवून जादा पैसे कमविण्याचा गोरख धंदा करीत असल्याने ग्राहकांमधून या दूग्ध व्यवसायाबाबत संताप व्यक्त होत आहे.
म्हशीच्या दूधाची फँट कमीत कमी सहा झिराे आसने आपेक्षित आहे.दि.1 एप्रिलला मनमानी पध्दतीने म्हशीच्या दुधाला ग्राहकांकडून 10 रुपये वाढवून 60 ऐवजी 70 रुपये दर घेतला गेला आहे. 70 रूपये किंमतीच्या मानाने दूधाची प्रत ही चांगली आसने तितकेच गरजेचे आहे.
या वाढत्या दराबाबत दुध डेअरीचालकांवर अंकुश ठेवणारे कोणी? आधिकारी आहे की नाही असा संतापजनक सवाल ग्राहकांमधून विचारला जात आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनीच याकामी लक्ष घालून मनमानी पध्दतीने दुधाचे दर वाढविणार्या दुध डेअर्यांवर नियंत्रण ठेवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज