mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! मंगळवेढयात पाच तर सांगोल्यात तीन ठिकाणी दुध डेअर्‍यांवर अन्न भेसळ जिल्हास्तरीय पथकांच्या धाडी; त्या दुधाचे नमुने पाठविले प्रयोगशाळेकडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 6, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
दूधास एफआरपी लागू करा! गाईच्या दुधास ४०, म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर भाववाढ द्या, मगच आषाढी पूजेला या; मुख्यमंत्र्यांना इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात तसेच सांगोला तालुक्यात सोलापूर येथील अन्न व भेसळ विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून दुधाचे नमुने घेतल्याने दुध डेअरी चालकांमधून मोठी खळबळ उडाली असून भेसळ करणार्‍यांनी या पथकाचा धसका घेतला आहे.

दरम्यान, नागरिकांना विनाभेसळचे दुध मिळावे यासाठी यापुढेही अधुनमधून धाडसत्र राबविण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

राज्यात मोठया प्रमाणात दुधामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर ही भेसळ रोखण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

दुधातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना स्वच्छ व गुणवत्तापूर्वक दुधाचा पुरवठा होण्यासाठी या कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

मंगळवेढा शहरात दि.4 रोजी श्रीराम मिल्क कलेक्शन सेंटर,होनमाने गल्ली,मायाक्का मिल्क प्रोडक्ट सांगोला नाका,विजया महिला दुध संघ,गुंजेगांव,हिरीजेट फुडस, आंधळगांव,हटसन दुध डेअरी संकलन केंद्र बोराळे आदी ठिकाणी छापे टाकण्यात येवून येथील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

तसेच सांगोला तालुक्यातील  अग्रणी मिल्क अँड मिल्क प्रोसेस,राजापूर पाटी,सुपर सुर्योदय अ‍ॅग्रो अँड  मिल्क इंडस्ट्रीज प्रा.लि.मेडसिंगी,व्हीआरएस फुडस एलटीडी पारस मेडसिंगी आदी ठिकाणचेही दूधभेसऴचे नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान या कारवाई मोहिमेत जिल्हा दुध विकास अधिकारी डॉ.मिलाक्षणी जगताप,अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, केमिस्ट अधिकारी सुरेश सरडे,सहाय्यक अमोल गुंडेस्वार व इतर अधिकारी यांचा समावेश होता.

दरम्यान, मंगळवेढयात म्हशीच्या दुधात जर्सी गाईच्या दुधाची भेसळ करून ती ग्राहकांना प्रती 70 रुपये लिटर दराने विक्री करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या हाेत्या.

जर्सी गाईचे दुध मिक्स केल्यामुळे म्हशीच्या दुधाचा रंग बदलून तो पिवळसर दिसून येत असल्याच्या गृहिणींच्या याबाबत तक्रारी आहेत. म्हशीच्या दुधाला फॅटप्रमाणे 60 रुपये प्रतिलिटर तर जर्सी गाईच्या दुधाला 34 रुपये प्रति लिटर असा दर मिळत आहे.

दुध डेअरी चालक जादा पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी कमी दराचे जर्सी गाईचे  दुध म्हशीच्या दुधात मिसळून ग्राहकांना फसवून जादा पैसे कमविण्याचा गोरख धंदा करीत असल्याने ग्राहकांमधून या दूग्ध व्यवसायाबाबत संताप व्यक्त होत आहे.

म्हशीच्या दूधाची फँट कमीत कमी सहा झिराे आसने आपेक्षित आहे.दि.1 एप्रिलला मनमानी पध्दतीने म्हशीच्या दुधाला ग्राहकांकडून 10 रुपये वाढवून 60 ऐवजी 70 रुपये दर घेतला गेला  आहे. 70 रूपये किंमतीच्या मानाने दूधाची प्रत ही चांगली आसने तितकेच गरजेचे आहे.

या वाढत्या दराबाबत दुध डेअरीचालकांवर अंकुश ठेवणारे कोणी? आधिकारी आहे की नाही असा संतापजनक सवाल ग्राहकांमधून विचारला जात आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनीच याकामी लक्ष घालून मनमानी पध्दतीने दुधाचे दर वाढविणार्‍या दुध डेअर्‍यांवर नियंत्रण ठेवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दूध भेसळ

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
Next Post
दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, उपोषण मंडपातच सलाईनवर; कार्यकर्त्यांना टेन्शन; सरकारला जाग येणार का?

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..