टीम मंगळवेढा टाईम्स ।
आधारभूत दराने मका खरेदी सुरू करणेसाठी मंगळवेढा तालुक्यातील शेतक-यांकडुन वारंवार मागणी होत असल्याने मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करुन शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेउन महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर व
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करणेत आलेल्या हमीभाव मका केद्रांवर आधारभुत दराने १ कोटी ३७ लाख २२ हजार रुपयांची खरेदी करणेत आल्याची माहिती चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, दि.३१ जानेवारी २०२१ अखेर ३४६ शेतक-यांनी १ कोटी ३८ लाख रुपयांची ७४१७.५० क्विंटल १४८३५ पोती उच्चांकी मका खरेदी केली आहे.
हमीभाव दराने खरेदी करणेत आलेल्या मका या पिकाची ३४६ शेतक-यांनपैकी २९६ शेतक-यांची रक्कम १ कोटी १५ लाख २० हजार ८७५ रुपये त्वरीत शेतक-यांच्या खात्यावरती आँनलाईन जमा केली आहे.
तर उर्वरित शेतक-यांची रक्कम जमा करणेसाठी प्रयत्न सुरू आहेत मका विक्री करणेत आलेल्या शेतक-यांना पेंमेंट विषयी आही अडचणी निर्माण झालेस खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभु नागणे व खरेदी विभाग प्रमुख मच्छिंद्र कौंडुभैरी यांचेशी सपंर्क साधावा असे अवाहन करणेत आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज