टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे जिल्ह्यात आठवडाभरापासून 200 ते 300च्या घरात कोरोनाग्रस्त अढळून येत असून, एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 480 झाली आहे. मंगळवारी शहरात 255 कोरोनाग्रस्त आढळून आले, तर नऊ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. चिंचवड रेल्वे स्थानकालगतच्या आनंदनगर झोपडपट्टीत 25 जणांना कोरोनाची लागण झाली, तर पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात 36 रुग्णांची भर पडली आहे. तेथील एकूण रुग्णांची संख्या 457 झाली आहे. दोन्ही शहरांतील विविध रुग्णालयांत उपचार घेऊन कोरोनामुक्तस झालेल्या 160 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
सध्या 2 हजार 279 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यापैकी 176 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 140 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 875 एवढी झाली आहे. मंगळवारी नऊ रुग्ण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली असून, एकूण मृतांची संख्या 273 झाली आहे. पुणे शहरात मंगळवारी तब्बल दोन हजार 44 नागरिकांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 43 हजार 907 संशयित नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यात पाच हजार 427 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
पुणे शहरात दाट लोकवस्ती असलेल्या भागात, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आता पिंपरी-चिंचवडमधीलही झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी 36 कोरोनाग्रस्तांची भर पडली. त्यातील 25 रुग्ण चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीतील असून, येथील एकूण रुग्णांची संख्या 170 झाली आहे. तर महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 457 वर पोहोचली आहे. चर्हो्ली येथील तीन रुग्ण कोरोनामुक्तझ झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
पुणे शहरात मंगळवारी नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पाच पुरुष व चार महिला रुग्णांचा समावेश आहे. येरवड्यातील महिलेचा (30) समावेश आहे. रामटेकडीतील पुरुष (52), येरवड्यातील पुरुष (41), पर्वतीतील पुरुष (82), कॅम्प परिसरातील महिला (48), हडपसरमधील 52 व 67 वर्षीय महिला, तसेच नान पेठेतील 76 व 48 वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. या सर्व रुग्णांना कोरोनासह इतर आजार होते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
एसआरपीएफच्या २० जवानांना कोरोना
मुंबई घाटकोपर परिसरातून बंदोबस्त करून आलेल्या रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) ग्रुप दोन कंपनीतील 20 पोलिस कर्मचार्यांीना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या चाचण्या केल्या असता, 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना क्वा रंटाईन करण्यात आले आहे. अद्याप 33 पोलिसांचे अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती ग्रुप दोनचे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज