mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी : पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 22, 2021
in सोलापूर, राज्य
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दिवसेंदिवस विविध प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सर्वांची असून, त्यात प्रत्येकाने आपले सहकार्य द्यावे ही काळाची गरज आहे, असे उद्गार सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी केले.

शिवकृपा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

बाळीवेस येथील जाजू भवन येथे हे प्रदर्शन 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान सर्वांसाठी आले असून, येथे चार दिवसांपासून तीन फुटापर्यंतच्या मातीमधून बनविलेल्या विविध प्रकारातील आकर्षक गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. सातपुते यांच्या हस्ते गुरुवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शांती टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या संचालिका सुजाता सक्करगी, राष्ट्रीय कीर्तीच्या भारूडकार गार्गी काळे, ज्येष्ठ लेखिका सूनेत्रा पंडित, उद्योजिका जानवी माखिजा, माजी प्रशासकीय अधिकारी पौर्णिमा डोळे, पथनाट्य चळवळीचे उदगाते आशुतोष नाटकर, फोन पे कंपनीचे व्यवस्थापक धानेश सावळगी, ऑल इंडिया धनगर समाज पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मनीषा माने, निर्मला विभुते आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

भारूडकार गार्गी काळे यांनी आपल्या खड्या आवाजात गणेश वंदना व गणेश गीत सादर केले. कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण प्रतिज्ञाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गुंड यांनी केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी संजय गुडनाळे, कसबा गणपती प्रतिष्ठानचे रतीकांत हादरे, प्रा. अमित कासार, शिवानंद शिलवंत, अजय हक्के, विनोद पालकर, प्रा. शेफाली विभूते व वृक्ष विनायकच्या मधूर सोलापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अक्षरातून साकारले बाप्पा

सोलापूरसह राज्यभर आणि परदेशातही ज्यांच्या कलेची कीर्ती आहे असे, अक्षर व गणेश मित्र धानेश सावळगी यांनी वृक्ष विनायक हे नाव गणेशाच्या रुपात अवघ्या दीड मिनिटात स्केचपेनने कागदावर साकारले.

चार इंच ते तीन फुटाचे 45 प्रकार

बाळीवेस परिसरातील लातूर बँकेच्या वर असणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विविध 45 प्रकारातील मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती माझ्या मूर्तिकारांनी बनविलेल्या आहेत

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
Next Post
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा ब्रेकिंग! अर्धवट उघड्या दरवाजातून प्रवेश करून 1 लाख 34 हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला

ताज्या बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा