टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज सोमवारी संध्याकाळी सहा वाजता होईल. त्यासोबतच गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. आता उमेदवारांना आणि मतदारांनाही २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे.
गेली १५ दिवस प्रचारामुळे सगळीकडे चालू असलेली धामधूम थांबणार असल्याने आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान आज सोमवारी शक्यतो सर्वच उमेदवारांच्या पदयात्रेचे आयोजन केल्याचे वृत्त आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गेली पंधरा दिवस सर्वत्र गाड्यांना स्पिकर लावून चौका चौकामधून प्रचाराचा जोर सुरु होता. परिणामी आवाजाने त्रस्त झालेले नागरिक सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रचार थांबणार असल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात ४ उमेदवारांनी प्रचारात चांगलीच भरारी घेतली होती. प्रत्येक उमेदवाराचे वाहन मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून प्रत्येक खेड्यात प्रचार करत फिरत असल्याने एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते.
आज सोमवारी पदयात्रा निघणार असल्याने समोरासमोर या पदयात्रा येणार नाहीत याबाबत पोलीस यंत्रणा दक्षता घेत असून त्यावर पोलीस करडी नजर ठेवून आहेत.
गेल्या १५ दिवसाचा प्रचार हा शांततामय वातावरणात पार पडला असून शेवटचे दोन दिवस कुठेही गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज