समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स टीम
मंगळवेढा तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार नागेश वाकसे यांना तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली असून या पदोन्नतीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
नायब तहसीलदार (गट ब) संवर्गातील अधिकाऱ्यांना तहसीलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार पुणे विभागातील नायब तहसीलदार (गट ब) संवर्गातील १७ अधिकाऱ्यांना तहसीलदार (गट अ) मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे.
त्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील २ नायब तहसीलदारांचा समावेश आहे. राज्य सरकारने नायब तहसीलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार तहसीलदार संवर्गात पदोन्नती दिली आहे.
तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळालेल्यांमध्ये बजरंग चौघुले, सुनील शेळके, उदयसिंह गायकवाड, अंजली कुलकर्णी, रमेश पाटील, रवींद्र रांजणे, धनंजय जाधव, माधवी शिंदे, अनंता गुरव, रोहिणी शंकरदास, धनश्री शंकरदास, एस. आर. मागाडे, एन. एच. वाकसे, डि. के. यादव, पी. के. पवार, आर. एस. जाधव आणि एन. बी. गायकवाड यांचा समावेश आहे.
पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या पुणे विभागातील नायब तहसिलदारांची पदोन्नती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. ही पदोन्नती मिळण्याचा मागणीसाठी नायब तहसीलदार पल्लवी लिगाडे आणि अन्य नायब तहसीलदारांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली होती.
यानुसार मॅटने ऑगस्ट २०२० मध्ये पदोन्नती करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार राज्य सरकारने ही पदोन्नती दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज