टीम मंगळवेढा टाईम्स ।
रिलायन्स फाउंडेशन कडून मंगळवेढ्यामध्ये गरजूंना मोफत मास्क वाटपाचे समाजोपयोगी काम हाती घेतले आहे. रिलायन्स फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.
याप्रसंगी डॉ.शरद शिर्के, संत दामाजीनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतीश मोहिते, दिलीप उघाडे,बबलू सुतार, माजी नगरसेवक खंडू खंदारे,आनंद मुढे, पांडुरंग नकाते, दिगंबर यादव,स्वप्नील टेकाळे,संजय माळी, ओम शिर्के आदीजन उपस्थित होते.
समाजात अनेक लोक वंचित आहेत. सध्या कोरोनाचे सावट असल्याने अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्र्न आहे त्याच एकीकडे पोटतिडकीने जीवन जगणारे लोक अनेक ठिकाणी विना मास्कचे पाहाला मिळतात आणि त्यांचा संपर्क कधी कुठे आणि कसा कोविड बधितांच्या सोबत येतो आणि नकळत अनेकांना कोरोणाची लागण देखील होत आहे.
माञ रिलायन्स फाउंडेशनने नेमके हेच लक्षात घेतले व मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी 7 हजार 500 मास्क वाटपचा राबवत आहे.
त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेज ग्रामीण गोर गरीब जनते साठी तसेज भाजी विक्रेते, दुकानदार, विक्रेते,गाडी चालक यांना मास्क वाटप करण्यात आले. रिलायन्स फाउंडेशन याच्या कडुन यापुढे देखिल आसेच मोलाचे काम समजुपयोगी पडणारे राहाणार आसल्याचे मत रिलायन्स फाउंडेशनचे समन्वयक डॉ.शरद शिर्के यांनी व्यक्त केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज