देशांतर्गत बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे सोने-चांदीच्या किंमतीमध्ये (Gold-Silver Rates) तेजी पाहायला मिळाली. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या सोन्याचा वायदा भाव 1 टक्क्याने वाढून 51,399 रुपये प्रति तोळा झाली होती.
तर चांदीच्या किंमतीमध्ये 1.5 टक्के वाढ झाली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी भारतामध्ये सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळाला. तरी देखील 7 ऑगस्ट रोजी 56000 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यानंतर आता सोन्याची किंमत जवळपास 5000 रुपयांनी कमी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 2 टक्क्यांनी वाढले आहेत. डॉलरचे उतरलेले मुल्य आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) द्वारे आणखी कमी व्याजदर होण्याबाबतचे संकेत मिळाल्यामुळे सोने मजबुत झाले आहे.
अमेरिकेत सोन्याचा वायदे भाव 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1,974 डॉलर प्रति औंस होते.अमेरिकेच्या केंद्रीय बँकेचे चेअरमन जेरोम पावेल (Fed Chairman Jerome Powell) द्वारे नवीन रणनीतीबाबत देण्यात आलेल्या भाषणानंतर सोन्याचे भाव 2 टक्क्यांनी घसरले होते.
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष गुरुवारी म्हणाले की, केंद्रीय बँक महागाई दराच्या सरासरी दराचे लक्ष्य स्वीकारेल. याचा अर्थ असा की येत्या काही दिवसांत अमेरिकेत महागाई जरी वाढली, तरीही व्याजदर कमी राहतील. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की सोनं ही बिनव्याजी मालमत्ता असल्याने, त्या किंमतीला सपोर्ट मिळू शकतो.
सामान्यत: असे मानले जाते की कमी व्याजदरामुळे सोन्याला सपोर्ट मिळतो. कोणत्याही देशाचे चलन कमकुवत होणे आणि वाढणाऱ्या महागाईमुळे गुंतवणूकदारांना सोने फायदेशीर ठरते.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील केंद्रीय बँका आणि सरकारांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले आहे. यंदा सोन्याच्या किंमतीत सुमारे 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागाई आणि व्याजदराबाबत फेडरल रिझर्व्हने उचललेल्या पावलांमुळे जगभरात दीर्घकाळ तरलता (Liquidity) टिकून राहिल.
या निर्णयामुळे अनेक श्रेणीतील मालमत्ता वर्गामध्ये तेजी राहिल. सोन्यासह अन्य मौल्यवान धातू आणि कोर्स इक्विटीज मध्येही तेजी पाहायला मिळेल. दुसरीकडे सध्या सोन्यासाठी सर्वात मोठी जोखीम कोरोना व्हायरस लशीची उपलब्धता आणि स्टॉक मार्केटमध्ये करेक्शन आहे.
भारत सरकार आता स्वस्तात सोन्याची गुंतवणूक करण्याची आणखी एक संधी देत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सोमवारपासून सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या सहाव्या टप्प्यासाठी सब्सक्रिप्शन उघडले जाईल. रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या वतीने हा गोल्ड बाँड जारी करेल.
यावेळी आरबीआयने सोन्याच्या बाँडची नवीन किंमत प्रति ग्रॅम 5,117 रुपये निश्चित केली आहे. ही सदस्यता 4 सप्टेंबर रोजी बंद होईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रति ग्रॅम 50 रुपयांचा फायदाही गुंतवणूकदारांना मिळेल.
With the price of gold falling sharply, the government is offering an opportunity to buy gold at Rs 5,117
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज