mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेरण्याची तयारी सुरू; अभिजीत पाटलांसह कारखान्याच्या संचालकांवर शिखर बँकेकडून तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 15, 2024
in राजकारण, राज्य, सोलापूर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या मंगळवेढ्यात; जंगी स्वागत व रॅलीचे आयोजन; चेअरमन अभिजीत पाटीलांची ताकद आणखी वाढणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लोकसभा निवडणुकीची पडघम लवकरच वाजणार असताना आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय.

राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेकडून घेतलेल्या कर्जाची करारानुसार परतफेड न केल्याने संचालक मंडळावर गुन्हा नोंदवण्याबाबतची तक्रार बँकेच्या वतीने पंढरपूर तालुका पोलिसांकडे करण्यात आली आहे.

दरम्यान यावर तोडगा शोधण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील हे बँकेच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत जाणार आहेत. हा प्रकार पूर्वीच्या संचालक मंडळाच्या काळातील असल्याचा खुलासा अभिजित पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यात काम पाहत आहेत.

तालुका पोलिसांना हे पत्र शिखर बँकेचे अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी दिले आहे. दरम्यान या प्रकरणाने सोलापुरातील कारखानदारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विठ्ठल कारखान्याने शिखर बँकेकडून कर्ज घेतले असून डिसेंबर 2023 पर्यंत 254 कोटी लाख रूपये कर्ज आणि 177 कोटी 68 लाख रूपये व्याज इतकी रक्कम बँकेस येणे आहे. दरम्यान, 2021 मध्ये कारखाना आणि बँक यांच्यात करार होवून प्रति क्विंटल साखरेवर 800 रूपये प्रमाणे बँकेचे देणे परत करण्याचे ठरले होते.

दरम्यान, 2022 ला कारखान्याची निवडणूक होवून येथे अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निवडून आले. त्यांनी हा कारखाना 2022-23 या हंगामात चालवून जवळपास सव्वा सात लाख टन ऊस गाळप करून 6 लाख 64 हजार साखर पोती तयार केली.

कारखान्याच्या करारानुसार बँकेला प्रति पोते 800 रूपयांप्रमाणे 53 कोटी 15 लाख रूपये देणे अपेक्षित होते. मात्र ते पैसे बँकेत भरले गेले नाहीत. तसेच कारखान्याने उपपदार्थांची परस्पर विक्री केली आहे.

बँकेबरोबर झालेल्या कराराची माहिती असताना देखील विठ्ठल कारखान्याने कर्जाची रक्कम न भरल्याने संचालक मंडळ हे वैयक्तिक आणि सामूदायिक यास जबाबदार असल्याचा ठपका बँकेने ठेवला.

यासाठी अध्यक्ष अभिजित पाटील आणि वीस संचालकांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांना पत्र देण्यात आले. याबाबतची तक्रार पोलिसात दिली गेली आहे.

हा करार गेल्या वेळच्या संचालकांचा, अभिजीत पाटलांची माहिती

दरम्यान, याबाबत अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा करार आमच्या काळातील नसून मागील संचालक मंडळाने केला आहे. आम्ही कारखान्यात आल्यावर प्रारंभी ऊस उत्पादकांची थकीत तीस कोटींची रक्कम दिली.

तसेच शिल्लक साखर विक्रीतून आलेले पैसे बँकेला भरले होते. यानंतर हंगाम सुरू केला होता. त्यावेळी ऊस उत्पादकांना पैसे देणे आवश्यक असल्याने यासाठी पैसा वापरला गेला आहे.

दरम्यान, शिखर बँकेच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी आपण मुंबईत जात आहोत. यानंतर सविस्तर प्रतिक्रिया माध्यमांना देवू असे अभिजित पाटील यांनी सांगितले

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चेअरमन अभिजीत पाटील

संबंधित बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटली; उजनीतून शेतीसाठी सोडलेले पाणी ‘या’ तारखेपर्यंत राहणार; कालव्यातूनही शेतीला पाणी

शेतकऱ्यांनो! जनावरांच्या चाऱ्याची चिंता मिटली; उजनीतून शेतीसाठी सोडलेले पाणी 'या' तारखेपर्यंत राहणार; कालव्यातूनही शेतीला पाणी

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..