मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना जारी करावी आणि
चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही प्रश्न विचारण्यात आला.
यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत पूर्ण व्हाव्यात, अशी आमची इच्छा आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने तयारीही सुरू केली आहे.
पण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ज्या ठिकाणी पाऊस जास्त असेल, त्या ठिकाणी अतिरिक्त वेळ मिळावा, अशी आमची मागणी आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले. “येत्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही अपवादात्मक ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू शकतो.
कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे जिथे युती शक्य नाही, तिथे आम्ही स्वतंत्रपणे लढू. अशा ठिकाणी एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने लढण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असेही ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज