टीम मंगळवेढा टाईम्स।
रतनचंद शहा सहकारी बँकेचे व श्री.विदया विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा मंगळवेढा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष स्व.रतनचंद शहा यांच्या १९ व्या पुण्यस्मरणानिमित्त आज शुक्रवार दि.२५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता
चोखामेळा चौकातील शहा यांच्या निवासस्थानी स्व.रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी याकार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन स्व.रतनचंद शहा प्रतिष्ठानचे विश्वस्त राहुल शहा यांनी केले आहे.
मंगळवेढा तालुका मुस्लिम समाजाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांचे रक्तदान
हजरत पीर गैब-वो-मर्दाने गैब, मंगळवेढा येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मंगळवेढा शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी दृढ केली आहे. या शिबिरात ११ महिला भगिनींनी रक्तदान करुन सामाजिक नारी शक्तीचा नारा बुलंद केला आहे.
या शिबिराचे उद्घाट्न पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. मंगळवेढा शहरातील हजरत पीर गैब-वो-मर्दाने गैब येथे आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आ. आवताडे यांनी उपस्थित राहून या विधायक आणि लोकोपयोगी उपक्रमामध्ये सामील झालेल्या रक्तदात्यांचे विशेषतः महिला भगिनींचे आमदार समाधान आवताडे यांनी विशेष कौतुक केले.
तसेच सामाजिक एकात्मता आणि सलोख्याची बंधुता अंगीकारणाऱ्या सदर समाज बांधवांनी अशा प्रकारे समाजसेवेचे कार्य पुढेही करत राहावे अशा शुभेच्छा आ. आवताडे यांनी या निमित्ताने दिल्या.
यावेळी उद्योजक सरोज काझी, राष्ट्रवादी पार्टीचे अजित उपनगराध्यक्ष पडवळे, ज्ञानेश्वर कोळी, माजी सरपंच पांडुरंग कोळी, आझाद खवतोडे, नजीर काँग्रेस जगताप, माजी चंद्रकांत भगरे, हरिभाऊ नगरसेवक नाईकवाडी, कैलास पटेल, प्रविण इनामदार, बबलू सुतार, उरूस महेश हजारे, पत्रकार बाळासाहेब नागणे, समाज पदाधिकारी, इतर मान्यवर मंडळी आणि युवा सहकारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज