टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास फोटो शेअर करीत प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रणव मुखर्जी हे RSS साठी मार्गदर्शकाप्रमाणे होते. त्यांच्या निधनामुळे संघाचं कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे, अशी भावना संरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी निधन झालं.
त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांचे पूत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त सांगितले.
Pranab Mukherjee’s death is a big loss for RSS: Sanghchalak Mohan Bhagwat
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज