टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुंबई येथे आज सोमवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना आंदोलनात सहभागी होण्याअगोदरच पोलिसांनी रोपळे ( ता . पंढरपूर ) येथील बस थांब्यावरून ताब्यात घेतले.
मुंबई येथे आज मराठा समाजातील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नासाठी व मराठा आरक्षणाबाबत अधिवेशनातील प्रत्येक आमदारांना भेटून निवेदन देण्याची मोहीम आखण्यात आली होती.
यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना होणार होते. या मोर्चेची आक्रमकता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
रामभाऊ गायकवाड हे पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी रविवार ता. १३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रामभाऊ गायकवाड यांना रोपळे बसस्थानक येथून ताब्यात घेतले.(सकाळ)
आम्ही ताब्यात घेतले…
मुंबई येथे सोमवारी होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना आम्ही ताब्यात घेतले.- किरण अवचर , पोलिस निरीक्षक , पंढरपूर तालुका पोलिस ठाणे,
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज