मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । शेततळ्याच काम सुरू असताना पोकलेन ट्रॅक्टरवर कोसळून झालेल्या अपघातात शशिकांत शिवाजी शिंदे (वय ३० रा.अनवली ता. पंढरपूर ) हा युवक जागीच ठार झाला.हि घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास अनवली गावात प्रकाश शिंदे यांच्या शेतात घडली.
याबाबत माहिती अशी की शिंदे यांच्या शेतात शेततळं खोदण्याच काम सुरू आहे. यातील माती पोकलेननं काढून ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. ट्रॅक्टरवर शशिकांत शिंदे बसला हाता. पोकलेन मातीवरून घसरून ट्रॅक्टरवर कोसळले त्याखाली सापडून शशिकांत शिंदे जागीच मृत पावला.घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
———————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज