टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रूग्णसंख्या अचानक वाढली. मागील दोन ते तीन दिवसात १८ रूग्ण आढळून आले असून या रूग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात कोरोना रूग्णांची संख्या वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, गुरूवारी एकूण ४३ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यात २ लोक पॉझिटिव्ह आढळून आले.
सध्या रॅपिड ॲन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्टव्दारे तपासणी करण्यात येत आहे. वयोगटानुसार १६ ते ३० वयोगटातील १ तर ६० पेक्षा अधिक वय असलेला एक जण शुक्रवारी कोरोना बाधित झाला.
घरात विलगीकरण असलेल्या रूग्णांची संख्या १८ आहे असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
सणासुदीच्या काळात कोरोनाचे रूग्ण वाढू शकतात. व्हायरल इनफेक्शनच्या नावे जो संसर्ग रूग्णांना होऊ शकतो तो कोरोनाचाही व्हायरस असू शकतो, कारण व्हायरस कधीही मरत नाही.
कोरोना संसर्ग पुन्हा वाढला तरीही मृत्यूंचं प्रमाण कमी असेल तसंच रूग्णालयात रूग्णांना दाखल करण्याचंही प्रमाण कमी असेल मात्र लोकांनी काळजी घेतली पाहिजे.
कोरोना संपला आहे या भ्रमात राहू नये असंही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.(स्रोत:लोकमत)
सोलापूर शहरातील कोरोना रूग्णसंख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
आजपर्यंतचे पॉझिटिव्ह बाधित रूग्ण – ३४ हजार ५५९, आजपर्यंत मृतांची संख्या – १ हजार ५१६, शहरातील बाधित असलेले रूग्ण – १८ रूग्णालयातून बरे होऊन गेलेले रूग्ण – ३३ हजार २५
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज