टीम मंगळवेढा टाईम्स ।
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी यापूर्वी त्या-त्या मतदारसंघातील मतदारयादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनाच निवडणूक लढवता येत होती.
मात्र, बाजार समितीसाठी मतदारयादीत नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांना निवडणूक लढवता यावी, यासाठी शासनाने नियमात काही बदल केले आहेत.
यामध्ये शासनाच्या नवीन नियमानुसार दहा गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा तसेच ग्रामपंचायत सदस्य या मतदारसंघातून बाजार समितीची निवडणूक लढविता येणार आहे.
मंगळवेढा बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यामध्ये १० मार्चला प्रारूप अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. याच मतदारयादीवर आक्षेप नोंदवण्यास १० ते १६ मार्च या कालावधीत मुदत असून, प्राप्त आक्षेपांवर जबाबदार अधिकारी निर्णय घेत तक्रारींचा निपटारा करणार आहेत. अंतिम मतदार यादी २३ मार्चला प्रसिद्ध होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
निवडणुका ३० एप्रिलपूर्वी घेण्याबाबत नागपूर खंडपीठाने आदेश काढल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
यामध्ये ६ ते ९ मार्च या कालावधीत निवडणूक अधिकारी यांनी १ सप्टेंबर २०२२ नंतर घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश करत याद्या तयार करणे,
दि.१० मार्च रोजी सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, १० ते १६ मार्च या कालावधीत दावे हरकती मागवल्यानंतर यावर निर्णय होऊन २३ मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.
याबाबतच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केल्या आहेत.(स्त्रोत:लोकमत)
मंगळवेढा बाजार समिती मतदारसंघनिहाय मतदार
■ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ८३३
■ ग्रामपंचायत मतदारसंघ : ५६५
■ व्यापारी मतदारसंघ २३०
■ हमाल व तोलार मतदारसंघ : ३१
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज