mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणीची माघी यात्राही ‘या’ पध्द्तीनेच साजरी होण्याची शक्यता?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 31, 2021
in सोलापूर
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनामुळे अख्खा भारत देश लॉकडाऊन झाल्याने धार्मिक स्थळे, मंदिरांचे दरवाजे भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्यात आले. 8 ते 9 महिने मंदिरे बंद राहिली. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे चैत्री, आषाढी व कार्तिकी हे तीन महत्त्वाचे यात्रा सोहळे रद्द करीत प्रतीकात्मक स्वरूपात साजरे करण्यात आले.

अद्यापही राज्यातील कोरोनाचे संकट टळलेले नसल्याने 23 फेब्रुवारी रोजी येणार्‍या माघी यात्रेबाबतही सध्या संभ्रम आहे.

दरम्यान, शासनाने 28 फेबु्रवारीपर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर माघी यात्रेबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे स्थानिक व्यापारी, भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोना संकटामुळे गेले संपूर्ण वर्ष वारकरी संप्रदायासाठी काळे वर्ष ठरले होते. गेल्यावर्षी माघी यात्राच फक्त साजरी झाली. मार्चमध्ये कोरोना विषाणू आल्याने चैत्री यात्रा तसेच वर्षभरातील सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रादेखील रद्द करीत केवळ परंपरा जपत प्रतीकात्मक स्वरूपात साजरी करण्यात आली.

आषाढी यात्रेदरम्यान तीन वर्षांतून येणारा अधिक मास सोहळादेखील कोरोनामुळे रद्द करावा लागला. यामुळे साहजिकच मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्य विक्रीची दुकाने बंद राहिली. लाडू प्रसादाची विक्री थांबवण्यात आली. श्री विठ्ठलाच्या अन्नक्षेत्रावरही परिणाम झाला होता.

लॉकडाऊनमध्ये 8 महिन्यांनंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनाचे नियम व अटी पाळत भाविकांना विठ्ठल मंदिरात केवळ मुख दर्शनाकरिता प्रवेश देण्यात येऊ लागला. येणार्‍या भाविकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर पास दाखवल्यावरच मुख दर्शनाकरिता सोडले जात होते.

सध्या 20 जानेवारीपासून विनापास भाविकांना दर्शनाकरिता सोडले जात आहे. यामुळे 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रेचा सोहळादेखील परंपरागत साजरा होईल, अशी आशा भाविकांना आहे.

एका बाजूला कोरोनावरील लसीकरणाला देशभर सुरुवात झाली असताना अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. वारकरी संप्रदायाची माघी यात्रा 23 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या नियमांनुसार कोणत्याही यात्रा जत्रा भरवण्यास परवानगी नाही.

याबाबत मंदिर समितीची 2 फेब्रुवारी रोजी बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार असून शासनाच्या निर्देशानुसारच मंदिर समितीलाही यात्रेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे माघी यात्रा साजरी होण्यावर अनिश्चिततेचे सावट आहे.

वारकरी संप्रदायाची माघी यात्राही संचारबंदीमध्येच साजरी होण्याची शक्यता जास्त आहे. याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण वैष्णवांचे लक्ष लागून राहिले आहे.(पुढारी)

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूरमाघी यात्राविठ्ठल मंदिर

संबंधित बातम्या

संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मंगळवेढ्यात शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस आज धूमधडाक्‍यात साजरा होणार; सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

May 18, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखान्याचे ‘एवढे’ सभासद ठरले पात्र, ‘या’ महिन्यात मतदान होण्याची शक्यता; निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांची नियुक्ती

May 17, 2022
शिष्टाईला यश! सिद्धेश्वर आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले असे काही…; घालून दिला नवा आदर्श

शिष्टाईला यश! सिद्धेश्वर आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले असे काही…; घालून दिला नवा आदर्श

May 16, 2022
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

विकृती! लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केला आजीचा खून; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

May 16, 2022
Next Post
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढा ब्रेकिंग! दिलीप बिल्डकॉनच्या टिपरने घेतला तरुणाचा बळी, एकजण जखमी

ताज्या बातम्या

संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..