mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! पुरुषाचा हनी ट्रॅप अन् महिलांना लोन ट्रॅप; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 19, 2022
in क्राईम, राज्य, सोलापूर
सावधान! पुरुषाचा हनी ट्रॅप अन् महिलांना लोन ट्रॅप; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रोज अनेक ठिकाणी अनेक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकूवून त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करण्याच्या घटना समोर येत आहेत.

मात्र आता महिलांना देखील लोन ॲपच्या ट्रॅपमध्ये अडकवून हजारो रुपयांची मागणी होत असल्याची घटना समोर असल्याची माहीती पंढरपूर विभागाचे निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी दिली आहे.

फेसबुक या सोशल मीडिया वर अनेक पुरुषांना महिलांचे अनोळखी नंबर वरून मॅसेज येतात. पुरुषांशी त्या महिला ओळख करतात, सुरवात ही हॅलो ,हाय ने होते नंतर चॅटिंग द्वारे पुरुषाला मोहात ओढतात काही दिवसातच निवस्त्र व्हिडीओ कॉल करतात.

त्यानंतर पुरुषांनाही निवस्त्र व्हायला लावतात. त्या सर्व प्रकाराचे स्क्रीन रेकॉर्डिंग करुन घेतात. व त्या पुरुषांकडे ते चित्रकरण पाठवून सर्व सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी व भीती दाखवून त्याच्याकडे पैशाची मागणी करतात.

यानंतर अनेकजणांनी त्यांना पैसे दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु पैसे दिले तरी, पुन्हा ते पैसे मागतात. यामुळे अशी फसलेले तरुणनंतर पोलीस ठाण्यात तक्रर येत आहेत.काही तरुण समाजात आपली प्रतिष्ठा, नावाची बदनामी होईल म्हणून हा प्रकार कोणालाही न सांगता गपचूप सहन करतात.

नुकतेच पंढरपुरातील एका महिलेला व्हाट्सअप या सोशल मीडियावर लोन (कर्ज) हवा आहे का ? असा मेसेज आला. पैशाची गरज असल्याने तिने त्या मॅसेजला उत्तर दिले. त्यानंतर समोरील व्यक्तीने संबंधित महिलेची कागदपत्रे मागवूण घेतली.

यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांचा समावेश होता. त्या महिलेस चार हजाराचे कर्ज ही दिले.

परंतु समोरच्या व्यतीने संबंधीत महिलेच्या कागदपत्रावरील तिच्या चेहऱ्याचा फोटो वापरुन संगंणकाद्वारे (मॉफ )निवस्त्र फोटो तयार केले. व फोटो त्या महिलेला पाठवले.

तुमचे हे निवस्त्र फोटो सोशल मेडियावर व तुमच्या नातेवाईकांनाही पाठवून देईन अशी धमकी देऊन त्या महिलेकडे पैशाची मागणी करत होता.

परंतू त्या महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले असून, याबाबत निर्भया पथकाकडे तक्रार दिली असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी सांगितली.

अमिषाला कोणी बळी पडू नये…

सोशल मेडीयावर फसवा योजना टाकून फसवण्याचे प्रकार घडू शकतात. यामुळे अशा प्रकारच्या अमिषाला कोणी बळी पडू नये, अशा प्रकारचा गैर प्रकार कोण्यासोबत झाल्या असल्यास त्यांनी तत्काळ पोलीसांना कळावावे.

सर्व प्रकारची खातरजमा झाल्याशिवाय महत्त्वाची कागदपत्रे व फोटो कोणाकडे शेअर करु नये असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

सुंदरीचा फोटो दिसला की फसला…

फेसबुकवरील मॅसेजरच्या डिपीला सुंदर मुलीचा फोटो दिसतो. अन तिकडूनच पहिल्यांदा मॅसेज येतो. यानंतर पुरुषांना हनी ट्रॅप लावला जातो.

तर आता महिलांना देखील कर्ज देण्याचे अमिष दाखवून लोन ट्रॅपमध्ये अकडविण्यात येत आहे, यामुळे मोबाईल जपून वापरावे असे पंढरपूर निर्भय पथक प्रमुख प्रशांत भागवत यांनी आवाहन केले आहे.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हनी ट्रॅप

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
Next Post

महिलांनो! मंगळवेढ्यात आज आपत्कालीन व्यवस्थापनाची 'सुरक्षा कार्यशाळे'चे आयोजन; आगीपासून संरक्षणाचे मिळणार धडे

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा