टीम मंगळवेढा टाईम्स ।
रेङ अलर्ट फायर सिस्टीम व मंगळवेढा मल्टिस्पेशॅलिटी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मेङियम स्कुल मंगळवेढा येथे
आज गुरुवार दि.20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अग्निशमन मार्गदर्शन व आपत्कालीन व्यवस्थापनाची “सुरक्षा कार्यशाळा ” आयोजीत केले असल्याची माहिती संचालक डॉ.नंदकुमार शिंदे यांनी दिली आहे.
सर्व स्कुल स्टाफ, मुले, मुली, पुरूष व महिला पालक वर्ग यांच्यासाठी सदर “सुरक्षा कार्यशाळा” आयोजीत करण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धाना आगी पासून स्वसंरक्षण तसेच अग्निशमन उपकरणे वापर, आग कशी विझवायची, स्वतःहाची काळजी कशी घेयची,
आगीत होरपळने, भाजने यावर प्रथमोपचार, आग विझण्याच्या पद्धती, स्टो भङका, गॅस भङका याचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
यावेळी मार्गदर्शक म्हणून जी.एम दिवटे संचालक रेङ अलर्ट फायर सिस्टीम , महिला हाॅस्पिटल टिम तसेच सलग्न सर्व टिम उपस्थित रहाणार आहेत.
तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा व प्रशिक्षीत व्हावे व कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षीत व्हावे असे आवाहन. संचालक डॉ. नंदकुमार शिंदे, मुख्याध्यापक व स्टाफ तसेच रेङ अलर्ट फायर सिस्टीमचे सर्वेसर्वा जी.एम दिवटे यांनी केलेले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज