टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून पंढरपूर मध्ये आज नव्या 22 रुग्णांची भर पडली. आज सापडलेले रुग्ण हे शहराबरोबरच ग्रामीण भागातही असल्याने ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा अधिक पहिला होताना सध्याला दिसून येतोय.
‘या’ भागात आढळले नवे रुग्ण
आज बुधवारी कोर्टी गावांमध्ये 3 , गादेगाव 2 , करकंब 1 , लक्ष्मी टाकळी 1 , देगाव 2 , सरकोली 1 , आणि फुलचिंचोली गावामध्ये 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत.
तर शहरातील हरिदास वेस 1, कवठेकर गल्ली 1 , आणि जनकल्याण हॉस्पिटल 2, तर अनिल नगर 1, कोरोना बाधित रुग्ण आढळून आलाय.
उपचाराअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप.
आज बुधवारी शहरातील इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ राहणाऱ्या एका 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. आजच्या रुग्णाची कालिकादेवी चौक येथे आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी या रुग्णाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली.
मात्र शहरातील एका रुग्णालयांमध्ये वेळेत उपचार न दिल्याने आणि रुग्णास दाखल करून न घेतल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. तसेच या खाजगी कोविड रुग्णालयावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केली.रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट घरी आणल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.
याविषयी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित रुग्णालयात बाबत मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली असून पोलिसांची चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्या माहिती दिली.
In Pandharpur, a patient died due to lack of treatment and 22 new coronaviruses were added
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज