mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा समाज आक्रमक! आरक्षणासाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडीचे आयोजन; स्थगिती उठवण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 31, 2020
in राज्य, सोलापूर
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; सोलापूर जिल्हा बंद ? बाबत नवी घोषणा

सरकार जाणूनबुजून आरक्षणाच्या प्रश्नांबाबत उशीर करत असल्याचा आरोप

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत आता मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी पायी दिंडीचे आयोजन केले आहे. पंढरपूर ते मंत्रालय जवळपास 360 किलोमीटरचं अंतर पार करून ही दिंडी मुंबईत दाखल होणार आहे. 7 नोव्हेंबरला सुरु होणारी ही दिंडी 27 नोव्हेंबरला मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे.

या दिंडीत लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याची शक्यता मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी घोषणा आंदोलकांनी केली आहे.

याबाबत बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळून आता जवळपास दोन महिने उलटले आहेत. परंतु, अद्याप आरक्षणाबाबत कोणताही आवश्यक तो निर्णय घेण्यात आलेला नाही.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आपली बाजू मांडण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे गरजेचं होतं. परंतु, सरकारने याबाबत जाणूनबुजून उशीर केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा चार आठवड्यांची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे की, सरकार जाणूनबुजून आरक्षणाच्या प्रश्नांबाबत उशीर करत आहे.

हीच बाब लक्षात घेत आता आम्ही आत्तापर्यंत खूप आंदोलनं केली आहेत. परंतु, 7 नोव्हेंबरला जे आंदोलन करणार आहोत हे मात्र वेगळ्या पद्धतीचं असणार आहे. आम्ही 7 नोव्हेंबरला पंढरपूर येथे विठूरायचं दर्शन घेऊन आमच्या दिंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात करत आहोत.

या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये मराठा आरक्षण, सध्या जी मेगाभरती जाहीर केली आहे ती रद्द करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी हे प्रश्न मांडणार आहोत.(Abp)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूर ते मंत्रालयपायी दिंडीचे आयोजनमराठा आरक्षण

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..