mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूरातील पोलीस अधिकाऱ्याचे फेसबुक अकाऊंट हॅक, पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पंढरपूरातील पोलीस अधिकाऱ्याचे फेसबुक अकाऊंट हॅक, पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस

 

टीम मंगळवेढा टाईम्स । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वसामान्यांची ऑनलाईन फसवणूक असताना एका भामट्याने पंढरपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या भामट्यापासून सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन किरण अवचर यांनी केले आहे.


पोलीस अधिकार्‍याचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पैसे मागण्याचा प्रकार पंढरपूरमध्ये घडत आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी माझे अकाऊंट हॅक झाले आहे, कोणी पैसे मागितले तर पाठवू नका असे आवाहन केले आहे.

मागील महिन्याभराच्या कालावधीमध्ये शहरातील विविध भागातील नागरिकांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.

त्या फेसबुक अकाऊंट वरून अश्लील शिवीगाळ करण्यात येत आहे. या पीडित लोकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज देखील केला आहे. तक्रारी अर्ज येतातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सायबर सेल कळविले आहे.

पोलिस कार्यालयातील सायबर पोलिस स्टेशनला वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. त्यात बनावट फेसबूक अकाउंटच्या सहाय्याने फसवणूक केल्याचा अनेक तक्रारी आहेत. पूर्वी आठवड्यातून एखादी, दुसरी तक्रार येत होती. परंतु गेल्या महिन्यांपासून दररोज फेसबूक अकाउंट हॅक केल्याच्या तक्रारी येत आहेत.

फेसबूक अकाउंटचा पासवर्ड स्वतःचे नाव, आपला वापरात असलेल्या मोबाइल नंबर, गाडी नंबर, जन्मतारीख असे ठेवणाऱ्यांबाबत हा प्रकार घडत आहे. फेसबूक अकाउंट हॅक होऊ नये म्हणून अल्फान्युमेरिक पासवर्ड ठेवावा, जुने पासवर्ड बदलून दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनने नागरिकांना केले आहे.


त्याचबरोबर मोबाइल फोनवर अथवा कॉम्प्युटरवर फेसबूक अकाउंट चालू करताना स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड कोणाला दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी, मित्र, मैत्रिणीला आपले फेसबूक वापरण्यास देऊ नये व पासवर्ड शेअर करू नये, अशा दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

दुसऱ्याचे नावाने फेक फेसबूक अकाउंट तयार करणे हा माहिती तंत्रज्ञाना कायद्यांतर्गत गुन्हा आहे. आपली वैयक्तिक माहिती घरचा पत्ता, फॅमिली फोटो, शाळेचे नाव इत्यादी फेसबूकरव कोणाला शेअर करू नका,’ असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनने केले आहे.


माझ्या फेसबुक अकाऊंट हॅक करून डमी अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर मेसेंजरचा उपयोग करून माझ्या जवळच्या मित्रांना पेटीएम द्वारे पैसे मागण्याचा प्रयत्न होत आहे. तरी कोणाला असा मेसेज आला तर फोनवरून खात्री करा. असा प्रकार इतरांशी घडू नये यासाठी त्यांनी त्यांचे फेसबुक प्रोफाईल ब्लॉक करून ठेवावेत. – किरण अवचर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर


Pandharpur city police officer kiran avachar Facebook account hacked

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यातील सिध्दनाथ ज्वेलर्समध्ये भव्य जोडवी आणि पैंजण महोत्सव सुरु

मंगळवेढ्यातील सिध्दनाथ ज्वेलर्समध्ये भव्य जोडवी आणि पैंजण महोत्सव सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा