mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महसूल पंधरवडा अंतर्गत आज मारापूर येथे ‘महसूल ई प्रणाली’ या ऑनलाइन प्रक्रिये बाबत मार्गदर्शन कार्यक्रम; शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनाशी निगडित सर्व विषयाचे मार्गदर्शन लाभणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 9, 2024
in मंगळवेढा
महसूल पंधरवडा अंतर्गत आज मारापूर येथे ‘महसूल ई प्रणाली’ या ऑनलाइन प्रक्रिये बाबत मार्गदर्शन कार्यक्रम; शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनाशी निगडित सर्व विषयाचे मार्गदर्शन लाभणार

टीम मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा तहसील कार्यालय अंतर्गत महसूल पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असून आज दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मारापूर गावातील खंडोबा मंदिरासमोरील सभागृहामध्ये महसूल ई प्रणाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तहसीलदार मदन जाधव, मारापुर मंडळाचे मंडळ अधिकारी नागनाथ जोध, मारापुर तलाठी श्रीमती ज्योत्स्ना पुपुलवाड, लक्ष्मी दहिवडी तलाठी गणेश पंडित, देगाव व मुढवी तलाठी अमित धनवडे, घरनिकीचे तलाठी संदीप पवार

त्याचबरोबर मुढवी तलाठी श्रीमती रोहिणी भोईटे व गुंजेगाव तलाठी संग्राम वाडकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभणार असून

सदरचा कार्यक्रम मारापुरचे सरपंच विनायक यादव यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार असून मंगळवेढा तालुक्यातील सर्व खातेदार शेतकरी नागरिक यांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

ई फेरफार म्हणजे ऑनलाईन नोंदी बाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच ईपीक पाहणी ॲप मधून घ्यावयाच्या पीक पाहणी नोंदीचे सखोल मार्गदर्शन तसेच ई हक्क प्रणाली ही शासनाची नवीन सुरू असलेल्या योजनेची माहिती ई चावडी व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 प्रमाणे हस्त प्रमाद दोषाने

किंवा तांत्रिक दोषाने झालेल्या चुका दुरुस्ती करण्याबाबतचे मार्गदर्शन तसेच शासनाच्या पोर्टलवर खातेदारांना आपल्या अडचणी बाबत करता येणाऱ्या तक्रारीबाबतची माहिती इत्यादी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित सर्व विषयाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मारापुर मंडळ येथील व तालुक्यातील नागरिकांना अधिकाधिक शासन योजनांची माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा.

तसेच, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्‍वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल दिनापासून ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी नागनाथ जोध, व मारापुर मंडळातील सर्व तलाठी कोतवाल व पोलीस पाटील परिश्रम घेत आहेत.

तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी दहिवडी कोतवाल विकास माने, गुंजेगाव कोतवाल बुडबुडे, देगाव कोतवाल कोळी व मुढवी कोतवाल श्रीमती जाधव व मारापुर मंडळातील सर्व 12 गावचे पोलीस पाटील परिश्रम घेत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महसूल ई प्रणाली

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
Next Post
ज्वारी प्रक्रिया उद्योग राज्यात नावारूपाला येणार,  मनोज जरांगे यांची माहेश्वरी आर्ट गॅलरीला भेट; डॉ.प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी केले स्वागत

ज्वारी प्रक्रिया उद्योग राज्यात नावारूपाला येणार,  मनोज जरांगे यांची माहेश्वरी आर्ट गॅलरीला भेट; डॉ.प्रियदर्शनी कदम-महाडिक यांनी केले स्वागत

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..