टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी सोलापूर ते सांगली प्रवासादरम्यान मंगळवेढा पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉ प्रियदर्शनी कदम -महाडिक यांच्या माहेश्वरी आर्ट गॅलरी येथे भेट दिली.
यावेळी डॉ सुभाष कदम, उद्योजक पवन महाडिक,सह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकारी कर्मचारी यांनी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले.
गुरुवारी दुपारी सांगली येथे मराठा आरक्षण शांतता रॅली आयोजित केली असल्याने सांगलीकडे जात असताना त्यांनी मंगळवेढा येथील कदम यांच्या फॉर्म हाऊस वर माहेश्वरी आर्ट गॅलरी ला भेट दिली व स्वागत स्वीकारले.
यावेळी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतीवर आधारित उत्पन्न तसेच ज्वारी प्रक्रिया उद्योग याबाबत चर्चा केली माहेश्वरी आर्ट गॅलरी या संस्थेकडून निर्माण करण्यात आलेल्या कॅनव्हास पेंटिंगची पाहणी केली व या संस्थेच्या कलाकार व सहकाऱ्याशी चर्चा केली.
याप्रसंगी या भागातील भौगोलिक परिस्थिती व मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीवर देखील उपस्थित असलेल्या मान्यवरांशी भाष्य केले.
सुरुवातीस शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील महिलांनी मनोज दादा जरांगे पाटील यांचे औक्षण केले यानंतर त्यांना अश्वारूढ पुतळा समितीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाची माहिती सांगितली.
याप्रसंगी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यासह मराठा महासंघ मराठा सेवा संघ डॉ बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज