mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात शिक्षकांसाठी प्रेरणा शिबिराचे आयोजन; सदस्यांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे अभियान शिक्षक समितीने घेतले हाती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 11, 2022
in मंगळवेढा, शैक्षणिक, सोलापूर
मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेत होणार आहे शिक्षक भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड; आताच करा अप्लाय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने पंढरपूर विभागातील कार्यकर्त्यांसाठी मरवडे येथे रविवार दि. १३ रोजी एक दिवसाचे प्रेरणा शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली.

न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीद घेऊन गेल्या सहा दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक समिती कार्यरत आहे. १९६० च्या दशकात सोलापूरचे स्व.वि.भा.येवले यांनी या संघटनेच्या स्थापनेत मोठे योगदान दिले होते.

महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत स्व.दत्तो वामन पोतदार यांनी पहिले अध्यक्ष म्हणून तर स्व.येवले यांनी सरचिटणीस म्हणून धुरा सांभाळली होती. त्या काळांपासून शिक्षक समिती या चळवळीवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यात देखील कार्यरत आहेत.

संघटनेचे कार्य व ध्येय्य धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम तालुका शाखांतील केंद्र संघटकच्या माध्यमातून होत असते. संघटनेचा कणा असलेल्या कार्यकर्त्यांची बांधणी व सकारात्मक ऊर्जा देण्याचे अभियान शिक्षक समितीने हाती घेतल्याचे जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगितले.

त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागातील चार तालुका शाखांतील तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व तालुका शिक्षक पतसंस्थांचे संचालक अशा प्रमुख २०० कार्यकर्त्यांचे पहिल्या टप्प्यात प्रेरणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिक्षक समितीचे राज्यनेते सुरेश पवार यांच्या निवासस्थानी रविवार दि. १३ रोजी स.११ ते ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

यामध्ये तालुका शाखांचा कार्य आढावा, संघटना बांधणी, राज्य व जिल्हा शिक्षक समितीचे कार्य, संघटनात्मक कार्याचा प्रचार – प्रसार ,आगामी काळासाठी ध्येय धोरणे या विषयावर दोन सत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय कार्यकर्त्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना , प्रश्न व उपक्रमांचे संकलन देखील करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या सत्रात मोहोळ येथील मनोहरभाऊ डोंगरे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात येणार असून मंगळवेढ्यातील वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्र तसेच शिष्यवृत्ती धारक शिक्षक पाल्यांचा सत्कार देखील  करण्यात येणार आहे.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष विठ्ठल ताटे (मंगळवेढा ) सुनिल कोरे (पंढरपूर ) भारत लवटे ( सांगोला ) , धर्मराज चवरे ( मोहोळ ) यांच्यासह स्थानिक मंगळवेढा शाखेतील प्रमुख कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढामरवडेमेळावाशिक्षक

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Next Post
अभिमानास्पद! CA ‘सीए’ फाऊंडेशनचा निकाल जाहीर, मंगळवेढ्यातील सूरज सलगर याची बाजी; सुरजने उंचावले कुटुंबाचे नाव

अभिमानास्पद! CA 'सीए' फाऊंडेशनचा निकाल जाहीर, मंगळवेढ्यातील सूरज सलगर याची बाजी; सुरजने उंचावले कुटुंबाचे नाव

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा