टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुकाराम बीजेच्या मुहुर्तावर संपन्न होणाऱ्या मरवडे गावयात्रेचे औचित्य साधून छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हल सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने दि.१० ते १४ मार्च या कालावधीत पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
मरवडे गावयात्रेतील कुस्तीच्या आखाड्याची सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. या यात्रेला जोडूनच छत्रपती परिवाराचे वतीने मागील २३ वर्षांपासून मरवडे फेस्टिव्हल सोहळा आयोजित केला जातो.
यंदाच्या या सोहळ्याला १० मार्च रोजी प्रारंभ होणार असून धनश्री पतसंस्थेचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे , शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू कादे हे भूषविणार आहेत.
उदघाटन सत्रानंतर शिवरंजनी प्रस्तुत ‘गाणी तुमची आमची’ हा हिंदी-मराठी गीत संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भूदरगड (कोल्हापूर) येथील गुरुमाऊली प्रस्तुत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा मराठमोळा लोककलांचा अविष्कार सादर होणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आ.समाधान आवताडे हे भूषविणार आहेत.
दि.१२ मार्च रोजी दु.१ वाजता स्वच्छंद आर्टसचे अमित भोरकडे हे ‘ कसे असावे सुंदर अक्षर ? कसे असावे शुद्ध अक्षर’ ? या विषयावरील कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
तर रात्री ८ मरवडे फेस्टिव्हल निमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण भैरवनाथ शुगरचे प्रा.शिवाजीराव सावंत, विठ्ठल शुगरचे अभिजित पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल.
त्यानंतर प्रसिद्ध कवी प्रा.प्रशांत मोरे यांचा ‘ माय माझी ‘ हा काव्य अविष्कार सादर होणार आहे. तर दि.१३ रोजी दु. १ वाजता किरण बाबर हे ‘ मी वाचणारच ‘या विषयांवर कार्यशाळा घेणार असून विद्यार्थी , पालक , शिक्षक व अंगणवाडीताई यांच्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याच दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राच्या महागायिका कोमल पाटोळे व भैरव मार्तंड कलापथकाचा ‘व्रत लोककलेच लेणं महाराष्ट्राचं ! ‘ हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी अॕड.नंदकुमार पवार , सिद्धेश्वर आवताडे , हणमंतराव दुधाळ इ.मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत.
दि.१४ रोजी दु. १ वा. ‘प्रभावी सूत्रसंचलन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून अभिनव अकॕडमीतील सहकारी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता महाराष्ट्रातील नामवंत नृत्य कलावंतांच्या सहभागातून सजलेल्या ‘नृत्यजल्लोष ‘ या कार्यक्रमाने होणार असून यावेळी माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे , भगिरथ भालके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा सर्व रसिकांनी आनंद घ्यावा व अधिक माहितीसाठी 7057475610 / 9096259202 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन रावसाहेब सुर्यवंशी , शशिकांत घाडगे , धन्यकुमार पाटील , नवनाथ जाधव , सिद्धेश्वर रोंगे , सचिन कुलकर्णी , ज्ञानेश्वर कुंभार , प्रविण गुंड व छत्रपती परिवाराच्या वतीने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज