टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने आता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आपले सरकार सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरता येणार नाहीत.
तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातील जीआर काढला असून, या निर्णयाने सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शासनाने ‘आपले सेवा केंद्र’ चालकांना विश्वासात न घेता, थकीत मानधन न देता हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केंद्र चालकांनी केला आहे.
आतापर्यंत ‘आपले सेवा केंद्रां’नी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी केल्या आहेत, त्याचे मानधन शासनाने दिले नाही. तसेच आता आम्हाला विश्वासात न घेताच हा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचा त्यांचा आरोप आहे.
शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे.
या योजनेसाठी नोंदणीचे काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
सदर योजनेंतर्गत यापूर्वी ११ प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.
यापूर्वी सेविका, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, समूह, आशा, शहरी-ग्रामीण लाईव्हलिहूड मिशन, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, ग्राम सेवक आदींकडे अर्ज स्वीकारले जात होते. मात्र, अता केवळ अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारले जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज