टीम मंगळवेढा टाइम्स ।
मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाच्या पत्नीचे तब्बल १ लाख ९ ० हजार ३०० रूपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकात घडली.
याप्रकरणी शहर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अॅड . नामदेव मेटकरी हे पत्नी शीतल, मुलगा उत्कर्ष व मुलगी गाथा यांच्यासह तीन दिवसांपूर्वी आपल्या मुळ गांवी मेटकरवाडी (ता.मंगळवेढा ) येथे आले आहेत.
पत्नी व मुले सासुरवाडी म्हसवड येथे जाणार असल्याने त्यांना सोडण्यासाठी अॅड. मेटकरी आपल्या गाडीने पंढरपूर बसस्थानकात आले.
दुपारी २.१० वाजता तुळजापूर -सातारा बसमध्ये पत्नी शीतल व मुले बसली. यादरम्यान, गर्दीत बसमध्ये चढताना चोरट्यांनी शीतल यांच्या मोठ्या पर्समधील दागिने ठेवलेली लहान पर्स हातचलाखीने लंपास केली.
त्यामध्ये ठेवलेले ४८ हजार रूपये किंमतीचे कानातील १२ ग्रॅम सोन्याचे टॉप्स, साखळी, वेल , १४ हजारांची एक अंगठी, २४ हजारांची सोन्याची चेन, १२०० रूपयांची चांदीची जोडवी,
६०० रूपयांचे चांदीचे कानातील जोड , १५०० रूपयांचा मोबाईल चार्जर, १ हजारांची पर्स आणि १ लाख रूपये रूपये किंमतीचे रिअल डायमंड पेंडेंट व कानातील एक जोड असा एकूण १ लाख ९० हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरीस गेला.
मंगळवारी याबाबतची माहिती शीतल यांनी पती अॅड .नामदेव मेटकरी यांना दिल्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली.
चोरी लक्षात आली पण
बसमध्ये बसल्यानंतर पर्स चोरी झाल्याचे शितल मेटकरी यांच्या लक्षात आले पण त्यांनी भीतीपोटी आपल्या पतीला याची माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी फोनवरून आपले पती ऍड नामदेव मेटकरी याना या घटनेची माहिती दिली . त्यानंतर मेटकरी यांनी पंढरपूर शहर पोलिसात सदर चोरीबाबत फिर्याद दिली आहे.
सलग दुसरी घटना
इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील शुभांगी रेवणनाथ यादव पती आणि मुलांसोबत नातेवाईकांना भेटून त्या परत आपल्या गावी निघाल्या असता पंढरपूर बस स्थानकावर बसमध्ये चढताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. मंगळसूत्रातील काही मणी यादव यांच्या हातावर ओघळले तेंव्हा हा प्रकार लक्षात आला परंतु पन्नास हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून चोरटा पसार झाला.
मंगळवेढा कनेक्शन
दोन्ही घटनात मंगळवेढा कनेक्शन आहे हा योगायोग आहे की यामागे दुसरे काही नियोजन आहे हा प्रश्न आहे. शुभांगी यादव या देखील मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथून पंढरपूर बस स्थानकात आल्या होत्या आणि दुसऱ्या घटनेती मेटकरी कुटूंब देखील मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथून पंढरपूर बस स्थानकात आलेले होते.
बसमध्ये चढताना चोरी
पंढरपूर बस स्थानकावर झालेल्या दोन्ही चोरीच्या घटना या बसमध्ये चढताना झाल्या आहेत. फलाटावर बस लागली की जागा मिळविण्याच्या हेतूने प्रवाशी बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असतात. बसच्या दरवाजाजवळ मोठी गर्दी केली जाते . यावेळी ढकलाढकली आणि रेटारेटी होत असते . याच गर्दीचा फायदा घेत चोरटे कौशल्याने चोरी करून पसार होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज