मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील घरफोडी गुन्हयातील 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे चोरटयांकडून जप्त केलेले दागिने न्यायालयाच्या आदेशाने संबंधित फिर्यादीला पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्याने महिला फिर्यादीमधून समाधान व्यक्त होत आहे.
या घटनेची हकिकत अशी,भोसे येथील फिर्यादी शारदा उत्तम कोपे यांची दि.21 ऑक्टोबर 2022 मध्ये भर दिवसा चोरटयांनी सायंकाळी 4.00 ते 5.45 च्या दरम्यान घरात प्रवेश करून
कपाटात ठेवलेले 3 सोन्याच्या अंगठया,लहान दोन अंगठया,झुबे,डोरले,वेल व रोख 20 हजार रुपये असा एकूण 2 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला होता.
त्यापैकी सोन्याच्या तीन अंगठया,डोरले,झुबे,वेल असा एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल सदर चोरटयांकडून पोलिसांनी जप्त केला होता.
हा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी महिला शारदा कोपे यांना पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या हस्ते दि.13 जून रोजी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात बोलावून देण्यात आला.
दरम्यान, उशिरा का होईना पोलिसांनी तपास करून चोरीला गेलेले सोने मिळवून दिल्यामुळे सदर महिलेच्या चेहर्यावर दागिने घेताना आनंद दिसून येत होता.
प्रथमतः पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला होता.तपासिक अंमलदार दत्तात्रय येलपले यांनी चोरटयांचा शोध घेवून आरोपी विजय छबू काळे (मूळ रा.फोंडशिरस सध्या रा.हाजापूर) याला अटक केली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज