टीम मंगळवेढा टाईम्स । शेतात शेळ्या चरण्यास सोडण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ करुन मारुन बांधात घालीन अशी धमकी देत डोक्यात दगड मारुन जखमी केले. ही घटना वाकी ( घे ) ता.सांगोला येथे घडली.
फिर्यादी बापू तातोबा गरंडे रा.वाकी घेरडी , ता.सांगोला हे शेळीपालन करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचा मुलगा बिरा गरंडे यांच्या नावे असलेली शेती कुशाबा नामदेव निमंग्रे,रा. वाकी घेरडी , ता. सांगोला यांच्या शेतालगत आहे.
वाकी ( घे ) ते घेरडी जाणाऱ्या रोडलगत मुलगा बिरा याच्या नावे असलेल्या शेताच्या बांधाजवळ बापू गरंडे हे शेळ्या चारत होते. त्यावेळी कुशाबा निमंग्रे हा तेथे येऊन तु माझ्या रानात शेळ्या का सोडल्या असे म्हणून चिडून जाऊन त्याने बापू गरंडे यांना शिवीगाळ करुन तुला मारुन बांधात घालीन अशी धमकी दिली.
तसेच तेथे डोक्यात दगड मारुन जखमी केले. याप्रकरणी बापू गरंडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
One beaten for grazing goats at Waki Gherdi
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज