मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील ७ दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली आहे.
पांडुरंग परिवाराच्या वतीने १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या काळामध्ये स्व. सुधाकरपंत परिचारक स्मृती सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. याबाबत मा.आ. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रणव परिचारक आणि पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेत्यांच्या अध्यक्षतेखाली,
शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यानुसार स्व.सुधाकरपंतांचा वसा आणि वारसा सेवेच्या रूपाने सुरू ठेवण्यासाठी, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने चंद्रभागा नदी स्वच्छता अभियान, विविध वृद्धाश्रम, बालकाश्रम, कुष्ठरोग वसाहत, अंधशाळा, विविध शाळांमध्ये सकस भोजन, आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,
दिव्यांग नागरिकांसाठी, महिलांसाठी हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दंतरोग तपासणी शिबिर, महिला बचत गटांना अर्थसहाय्य करणारा कर्ज वाटप सोहळा, असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याशिवाय भजन, कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन देखील होणार आहे. पंढरपूर शहरातील गणेश रुग्णसेवा मित्रमंडळाच्या
वतीने कायमस्वरूपी कर्मयोगी दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र उभा करण्यात येत आहे. हे सर्व कार्यक्रम २५ ऑगस्टपर्यंत पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय काही विशेष कार्यक्रमांचे आयोजनही पांडुरंग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सेवा सप्ताहमधील विविध कार्यक्रमांचे आयोजन हे पंढरपूर शहरातील आजी-माजी नगरसेवक, पांडुरंग परिवारातील पदाधिकारी, पांडुरंग परिवारातील युवा नेते, मित्रमंडळी आणि कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींकडून करण्यात आले आहे.
गुरुवारी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतिदिनी, पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये तसेच ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये सकाळी ९ वाजता प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, वाखरी येथील नियोजित कर्मयोगी सुधाकरपंतांच्या स्मारकाच्या ठिकाणी, कीर्तन व पुष्पांजली
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या सर्व कार्यक्रमास पंढरपूर शहरातील नागरिकांनी, पांडुरंग परिवारातील सदस्य, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून, मोठ्या मालकांच्या विचाराचा वारसा सेवारुपी आत्मसात असे आवाहन या करावा, असे निमित्ताने माजी आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज