टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात लोकप्रिय असलेल्या साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या ११ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता स्वागत सभारंभ व सुरसंगम ग्रुप प्रस्तुत हिंदी व मराठी गाण्यांचा ट्रॅक शो
तसेच सायंकाळी ६ वा.मंगळवेढा येथील खोमनाळ रोडवरील मैत्री लाॅन्स मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी,लेखक व वात्रटिकाकार भारत सातपुते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती साप्ताहिक रणयुग टाईम्सचे मानद संपादक दिलीप बिनवडे यांनी दिली.
सा.रणयुग टाईम्सच्या आकराव्या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने समाज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २५ मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येईल.
याप्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे (जीवनगौरव), राहूल शहा (मंगळवेढा भुषण),अनिल सावंत (कार्यरत्न), संजय आवताडे (उद्योगरत्न),सचिन जाधव (लोकरत्न), अनिलभाऊ इंगवले (सहकाररत्न),अस्लम चौधरी(संयमी राजरत्न),अॅड.सौ.कोमल साळुंखे-ढोबळे (क्रांती-ज्योतीरत्न),
गौरीशंकर बुरकुल (कार्यकुशल जननायक),प्रा.सौ.तेजस्विनी कदम (कर्तृत्वान नारीरत्न), ज्ञानेश्वर चव्हाण (समाजरत्न),सुलेमान तांबोळी (संघर्षरत्न), बापूसाहेब मेटकरी (बहुजनरत्न), सौ.करूणा शिवशरण (प्रेरणादायी उद्योजिका ),राजेंद्र माळी (संघटनरत्न),चंद्रकांत वेदपाठक(कला तपस्वी),
मल्लिकार्जून देशमुखे (दर्पणरत्न),भुमेश यनगंदूल (युवारत्न),चिदानंद माळी(शिक्षण सेवारत्न),लहू ढगे-(सुररत्न),बालाजी लोहकरे (कृषीरत्न),सौ.सुरेखा घोडके-सावळे(ज्ञानरत्न),
सुरज डोके(युवा उद्योजकरत्न), संतोष मिसाळ (निवेदनरत्न) तसेच बेगमपूर येथील शुभारंभ अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड यांना (सहकार संस्थारत्न) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह,मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून या साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या आकराव्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साप्ताहिक रणयुग टाईम्सचे संस्थापक-संपादक प्रमोद दिलीप बिनवडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज