टीम मंगळवेढा टाईम्स ।
आमदार समाधान आवताडे हे पुढच्या वेळेस आमदार तर होतीलच, परंतु मंत्रीदेखील होतील, असे भाकीत सहकारी शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी हा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर शहरातील वसंत नगर येथे देवाच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमप्रसंगी काळे बोलत होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे, मनसे नेते दिलीप धोत्रे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक रानगट, गुरुदास अभ्यंकर, विनोद लटके, संतोष डोंगरे, संतोष कवडे, सुहास पाटील, रवी सोनार, सुधीर साळुंखे, चंद्रकांत कुंभार पांडुरंग साळुंखे, संजय कांबळे उपस्थित होते.
यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, मी विरोधात असूनही निधी खूप आणला आहे. सुदैवाने डब्बल इंजिनचे सरकार आले, यामुळे तर अधिकच निधी मिळत आहे. विकास आराखडा म्हणलं तर मंदिराजवळच भागाचा आपण विचार करत असतो,
परंतु त्यासाठी पाचशे कोटींच्या आसपास निधी येत असतो, त्यात शहरातील सर्व भागातील कामे होत असतात. वसंत नगरमधील कामासाठी २०.५१ लाखांचा निधी दिला असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
विकासकामांचा आराखडा तयार केला आहे. त्यांचा पाठपुरावा आपण करावा. तसेच या भागातील दोन नगरसेवकांनी पाठपुरावा केला नाही तर त्या दोघांना या भागात येऊ देणार नाही असे कल्याणराव काळे यांनी जाहीर केले.
वसंत नगर व यशवंत सोसायटीकडे निधी येऊ द्यायचा नाही असे काम दोन नगरसेवक करत असल्याची खंत काळे यांनी व्यक्त केली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज