टीम मंगळवेढा टाईम्स ।
धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक हार, शाल, फेटे घेवून येत असतात.
त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना ग्रंथ, शालेय साहित्याची गरज असते. त्यामुळे नागरिकांनी वाढदिवसादिवशी शाल, फेटे, हार घेवू नये त्याऐवजी ग्रंथ, शालेय साहित्य आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्थसंस्था आणि शिक्षणाच्या सहयोगाने मंगळवेढा भूमीत जिव्हाळा आणि सहकार्याच्या जाणीवेने सहकार, समाजकारण, साहित्य आणि सांस्कृतिक, कृषि आणि उद्योग क्षेत्रात समृद्धतेचा शालीन,
परिवर्तनशील गतिशील स्पर्श लाभला असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.शिवाजीराव काळुंगे सर. दि.७ मार्च २०२३ हा सरांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा वाढदिवस.
पंचक्रोशीतील आपण सर्व जिव्हाळ्याने जोडलेले स्नेही आदरपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी हार, शाल, फेटा, घेऊन सत्कारास सातत्याने आणतात.
आपला स्नेह हा प्रा.काळुंगे यांच्या वाढदिवसपर शुभचिंतनासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपल्या शुभेच्छा जिव्हाळ्याने जपाव्या अशाच आहेत.
परंतु शुभेच्छा म्हणून सत्कारासाठी आणलेले हार व इतर साहित्य सन्मानपूर्वक जतन करता येत नाही. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण येत असताना रिकाम्या हाताने न जाता भेट देणे ही आपली संस्कृती आहे.
म्हणून हार, फेटे, शाली ऐवजी ग्रंथ व शालेय साहित्य भेट आणल्यास गरजू विद्यार्थ्यांना त्याचा आधार होईल. अशा कृतीतून आपल्या शुभेच्छा अधिक सत्कारणी लागतील.
त्यातून इतरांच्या जगण्याला आधार व्हावे असे काही घडले तर आपल्या प्रत्येकाच्या कृतीला एक अर्थ प्राप्त होतो. म्हणून ग्रंथ, शालेय साहित्य आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज