मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने अक्रियाशील सभासद केल्याची नोटीस ही बेकायदेशीर असून ती रद्द करावी व कागदपत्रे पडताळणीची तारीख त्वरीत कळवावी अशी मागणी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड.नंदकुमार पवार यांनी एका अर्जाव्दारे संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडे केली आहे.
९७ वा व्या घटना दुरुस्तीचा संदर्भ घेवून कार्यकारी संचालकांनी दिलेली नोटीस ही कायदयाची पायमल्ली करणारी असून मुळातच ती रद्दबातल आहे. अशा नोटीसा काढून सभासदांना अक्रियाशील सभासद करणे हे घटनाविरोधी आहे.९७ व्या घटना दुरुस्तीनूसार व संस्थेच्या पोटनियम १७ (अ) नुसार ५ वर्षे पूर्ण झालेली करून नाहीत,५ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वर्गवारी करण्याचा कार्यकारी संचालकांना अधिकार नाही.
नोटीस वेळेत देण्याबाबतचा ठराव ही संस्थेने केल्याचा उल्लेख नोटीसीत असल्याने ही नोटीस बेकायदेशीर आहे.५ वर्षातून एका वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहणे बंधनकारक आहे.कारखान्यात रजिस्टर ठेवणे बंधनकारक असताना कारखान्याने रजिस्टर न ठेवता नंबर नसणाऱ्या सुट्टया कागदावर सह्या घेतल्या आहेत. मंगळवेढा तालुका दुष्काळी असून ऊस लागवड नाही. त्यामुळे नोंदी नाहीत. त्यामुळे कारखान्यास ऊस घालण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय कोणत्याही कायदयात दुरुस्तीचा कारखान्यास ऊस घातला पाहिजे व दुसऱ्या कारखान्यास ऊस घालू नये अशी कोणतीही तरतूद नाही.
शिवाय दामाजीने तोडणी यंत्रणाच लावलेली नव्हती. वार्षिक सर्वसाधारण सभेस आपण उपस्थित असल्याबाबतचा व कारखान्याकडून साखर घेतल्याबाबतची खातरजमा करून देण्यासाठी आपण स्वतः कागदपत्रासह येणार असून कोणत्या तारखेस व कोणत्या वेळेत यावे हे ताबडतोब कळवावे असे अॅड. नंदकुमार पवार यांनी त्या अर्जात म्हटले आहे.
———————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज