mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बेकायदा वाळूसाठा केल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यासह अन्य एकास बजावली दंडाची नोटीस!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बेकायदा वाळूसाठा केल्याप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यासह अन्य एकास बजावली दंडाची नोटीस!

त्या पाेलिस कर्मचार्यावर पोलिस अधिकारी कारवाई करणार की पाठीशी घालणार याकडे नागरिकांच्या लागल्या नजरा…..!

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील गट नं. 53/3 येथे बांधकाम ठिकाणी बेकायदा 4 ब्रास वाळूचा साठा केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी व त्याच गावातील एका व्यक्तीस या वाळू साठा प्रकरणी 1 लाख 56 हजार रुपयांचा दंड तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दंड ठोठावल्याचा आदेश पारित केला आहे. Notice issued to another along with police personnel for illegal sand hoarding mangalwedha police station

 

लक्ष्मी दहिवडी येथील एक पोलिस कर्मचारी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असून गट नं. 53/3 मध्ये घराचे बांधकाम सुरु आहे.सध्या जिल्हयात मागील अनेक महिन्यापासून कुठेही शासकीय वाळू लिलाव  झाला नसताना या बांधकामावर चार ब्रास अनधिकृत वाळू कोठून आली असा संशय पाहणार्‍या नागरिकांना आल्याने सदर नागरिकांनी तहसीलदार यांचेकडे तक्रार केल्यानंतर संबंधित गावचे तलाठी यांना अनधिकृत वाळू साठयाचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यानंतर तलाठयांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.यामध्ये गावातील एका व्यक्तीने 53/3 मध्ये केलेला वाळू साठा हा माझा असल्याचा दावा केला आहे. 

मात्र या दाव्यावर ग्रामस्थांतून उलट सुलट चर्चा सुरु झाली असून त्या पोलिसाला वाचविण्यासाठी हा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. सदर घटना वादग्रस्त झाल्याने तहसीलदार यांनी 4 ब्रास वाळू साठयावर चालू बाजार भावाच्या पाचपट रकमेप्रमाणे 1 लाख 56 हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस दोघांनाही बजावली आहे. या वादाची शहनिशा करण्यासाठी आता महसूल प्रशासनाकडून जागेचा उतारा काढून तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. 

सात दिवसाचे आत दंड भरण्याचे आदेश पारित केले आहेत.अदयापही गौण खनिज विभागाकडे दंड न भरल्याने व मुदत संपल्याने आता 7/12 वर बोजा चढविण्याची प्रक्रिया गौण खनिज विभागाकडून होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान,ही वाळू बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन अडवून यावर  पोलिस कारवाई न करता ते वाहन थेट  बांधकामावर आणल्याची खमंग चर्चा सुरु आहे.यावर पोलिस अधिकारी कारवाई करणार की कर्मचार्‍याला अभय देणार? याकडे तमाम सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान,तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात ग्रामस्थांसमोर गट क्रमांक 53/3 येथे सुरु असलेले अर्धवट बांधकाम हे त्या पोलिस कर्मचार्‍याचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर त्या इसमाच्या पंचनाम्यात गट नं. 53/3 येथे राहण्यासाठी घर बांधत असून दि. 24 मे रोजी त्या बांधकामासाठी वाळू साठा केल्याचे जबाबात म्हटले आहे. परिणामी एकाच गट क्रमांकामध्ये दोघांनी पंचनाम्यात बांधकामाचा अजब दावा केल्याने पंचक्रोशीत या बांधकामाची रंगतदार चर्चा रंगली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
गोकुळ अष्टमीसाठी सर्व मंदीरे खुली करण्याबाबत अ.भा.वारकरी मंडळाचे प्रांताधिकारी यांना निवेदन

गोकुळ अष्टमीसाठी सर्व मंदीरे खुली करण्याबाबत अ.भा.वारकरी मंडळाचे प्रांताधिकारी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 22, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढ्यात थरार! मेहुणीशी दुसरे लग्न केल्याचा राग; जावयावर तलवारीने वार करून जागीच संपवले; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

October 22, 2026

कामाची बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 9000 रुपयांपर्यंतची मदत?; संकटात मदतीचा हात, सरकारची विशेष योजना

October 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा