मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मोबाइलसाठी हट्ट धरलेल्या मुलाला रागावल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडली. ओम संतोष कारंडे (वय १५, रा. दयानंद कॉलेज जवळ, जागृती मंदिर, गुजर वस्ती) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारास राहत्या घरी घडली. घटनेच्या आधी त्याचा मामा मुलगी झाल्याने आनंद म्हणून मिठाई घेऊन त्यांच्या घरी आला होता.

या आनंदात ओम याची आई मामाशी बोलत घरात बसली होती. त्यावेळी ओमने बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नववी पूर्ण झाल्यावर ओमला आई देणार होती मोबाईल
ओम हा मागील अनेक दिवसांपासून मोबाइलसाठी हट्ट धरून होता. यासाठीच त्याने गुरुवारी ही आईकडे मोबाइलची मागणी केली. आईने त्याला नववीचे शिक्षण झाल्यानंतर तुला मोबाइल घेऊन देते असे समजावून सांगत होती; पण तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता.

आईने त्याला रागावले. यामुळे रागाच्या भरात त्याने गळफास घेतला. ही घटना कळाल्यानंतर कुटुंबीयांनी नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरवून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ओम हा एसव्हीसीएस शाळेमध्ये नववीमध्ये शिकत होता. ऐन गुडीपाडव्याच्या दिवशी अशी दुःखद घटना
घडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती कळताच जोडभावी पोलिस ठाण्याचे हवालदार चेतन रुपनर यांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी सकाळी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नकार देण्याची पद्धत बदला
मोबाइल हे संवादाचे साधन असले तरी त्याने कुटुंबातील प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. मुलांशी केवळ अभ्यासावर न बोलता त्यांच्या भावनांवर आणि आवडी निवडींवर दररोज गप्पा मारा. मुलांना नकार देताना ती रागात किंवा ओरडून सांगण्यापेक्षा त्यामागचे कारण शांतपणे पटवून द्या. अचानक मोबाइल काढून घेण्यापेक्षा त्याच्या वापराच्या वेळा हळूहळू कमी करा.
मुले कंटाळली की मोबाइलकडे वळतात. त्यांना मैदानी खेळ, वाचन किंवा एकत्र घरगुती कामात गुंतवून ठेवा. पालकांनी स्वतः तासन्तास मोबाइल वापरणे टाळावे. मुले आपले अनुकरण करत असतात, त्यामुळे घरामध्ये ‘नो गॅजेट झोन’ किंवा ‘नो गॅजेट टाइम’ निश्चित करा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संध्या काळे यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













