टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरालगतच्या दक्षिणेकडील भागाची सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली संत कान्होपात्रा नगर ग्रामपंचायत निर्माण होणार असून आहे. ६४ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या मंगळवेढा शहराच्या दक्षिण भागाचे लवकरच ग्रामपंचायतीत रूपांतर होणार आहे.
दि.१२ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संत कान्होपात्रा नगर हे महसूल गाव जाहीर केले आहे.
ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव शासनदरबारी अंतिम टप्प्यात आहे. त्याची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम अधिसूचना एक महिन्यात प्रसिद्ध होणार आहे.
या नव्याने होणाऱ्या संत कान्होपात्रा नगरची लोकसंख्या २००० ते ३००० असणार आहे. तालुक्यातील नव्याने निर्माण होणारी ही तिसरी ग्रामपंचायत आहे.
नव्याने निर्माण होत असलेल्या संत कान्होपात्रा नगर ग्रामपंचायतीमधे २०११ च्या जनगणनेनुसार एकूण कुटुंबांची संख्या ४४६ तर लोकसंख्या १३३७ आहे. क्षेत्रफळ ६४.६८ चौरस किमी असून वनक्षेत्र १५.५८ हे असून गायरान जमिन ९.४९ हे असणार आहे. २३८१ गट नंबर समाविष्ट करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज