mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्राचा नवीन ‘सातबारा’ उतारा असा असेल; तब्बल पन्नास वर्षानंतर झाला बदल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महाराष्ट्राचा नवीन ‘सातबारा’ उतारा असा असेल; तब्बल पन्नास वर्षानंतर झाला बदल



टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रातील सातबाऱ्यात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत सातबाऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.


आता सातबारा साधा, सहज समजेल व सुटसुटीत संगणकीय सातबाऱ्याच्या गरजा व सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत हा सातबारा असणार आहे. या संदर्भातील अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केला असून, आता महसूल यंत्रणे मार्फत हे बदल करण्यात येणार आहे.

सातबारा म्हटल की सहजासहजी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा विषय असतो.शासकीय भाषेत असलेल्या सातबा-या वरील नोंदी व त्यातील अडचणी हा मोठा गंभीर विषय असतो. यामुळेच आता महसूल विभागाने ब्रिटीश कालीन सातबाऱ्यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव जमाबंदी विभागाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला.

याबाबत ई- फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, या नवीन सातबाऱ्यामध्ये विविध प्रकारचे 11 बदल सुचविण्यात आले आहे. यात सातबाऱ्यावर प्रथमच महाराष्ट्र शासनाचा लॉगो, गावाचा बार कोड असे बदल करण्यात आले आहेत. याशिवाय नवीन सातबाऱ्यावर खार क्युआरकोड देण्यात आला असून, यामुळे सातबारा सहज स्कॅन देखील करता येणार आहे.

असे आहेत नवीन सातबाऱ्यात बदल

गाव नमुना नं.७ मध्ये गावाचे नावासोबत LGD (Local Governmnt Directory) कोड दर्शविण्यात येईल.

गाव नमुना नं.७ मध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र व ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात येईल.

नमुना ७ मध्ये नमूद क्षेत्राचे एकक काय आहे? हे समजण्यासाठी क्षेत्राचे एकक हा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात येत आहे. यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक वापरले जाईल.

नमुना ७ मध्ये खाते क्रमांक या पूर्वी इतर हक्क रकान्यासोबत नमूद केला जात असे तो आता खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल.

नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतरहक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या, आत्ता ती कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषामारून खोडून (strike through) दर्शविण्यात येतील.

कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.

कोणत्याही नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकान्याचे खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन रकाना समाविष्ट करून दर्शविण्यात येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखद्या स.नं / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.

नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना ७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील.

शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात येतील. बिनशेती च्या ७/१२ मध्ये पोट खराब क्षेत्र , जुडी व विशेष आकारणी , तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येतील.

नमुना ७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल.

बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. व त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न.१२ ची आवश्यकता नाही अशी सूचना छापण्यात येईल.

Fifty years of change on the seventeenth of the kingdom;  The new Satbara will be easy to understand

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
देशी बनावटीचे पिस्तुल, काडतुस पोलिसांनी केले जप्त; पंढरपूर तालुक्‍यातील दोघांना अटक

देशी बनावटीचे पिस्तुल, काडतुस पोलिसांनी केले जप्त; पंढरपूर तालुक्‍यातील दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा