mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

…अन्यथा सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार; शरद पवारांचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 9, 2021
in राज्य, राजकारण, सोलापूर
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानी घेतली शरद पवारांची भेट, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक भाजप सोडून इतर पक्षांनी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे असे सांगतानाच,जर योग्य सन्मान झाला नाही,तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवायला तयार आहे असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे.

जर योग्य सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे मत पवार यांनी मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे. #Solapur

— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आय कर विभागाने टाकलेल्या धाडी, ईडीच्या कारवाया आणि उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसेवर पवार यांनी भाष्य केले.

दिल्लीवरून राज्य सरकारला रोज अनेक गोष्टींवरून त्रास दिला जात असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. मी लखीमपूर येथे झालेल्या हिंसेचा जालियनवाला बागेशी संबंध जोडला.

हा उल्लेख सत्ताधाऱ्यांना रुजला नसल्याचे एका सत्ताधारी नेत्याने सांगितले. त्यामुळे छापेमारी करण्यात आली.पण तुम्ही छापा मारा, काही करा. पण मी सामाजिक बांधिलकी सोडणार नाही, असेही पवार यांनी निक्षून सांगितले.

इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून पवार यांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला.जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या असताना भारतात किंमती रोज वाढताना दिसत आहेत.

याला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे असा सवाल केला जात आहे.

लखीमपूर हिंसेंचा निषेध करण्यसाठी महाविकास आघाडीने येत्या ११ तारखेला महाराष्ट्र बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये सहभागी व्हा असे आवाहन करीत, एकही वाहन रस्त्यावर येता कामा नये.

कायदा हातात न घेता देशाला संदेश द्यायचा आहे. केंद्र सरकारला धडा शिकवायचा आहे, असेही पवार म्हणाले.आयकर विभागाच्या कारवाईसंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की,मला कळलं की काल अजित पवारांकडे सरकारने काही पाहुणे पाठवले होते.

ते पाहुणे येऊन गेले.पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.(स्रोत:मुंबई नगरी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसोलापूर

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

संतापजनक! समाजाने बहिष्कृत करून दंड केल्याची मंगळवेढयातील एका तरूणाची तक्रार

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा