mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवार-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर शिवसेना अलर्ट?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 18, 2021
in राज्य
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या भेटीची चर्चा सुरुच असताना, तिकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले.

संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरु होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेत्यांची रेलचेल सुरु आहे.

मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला महत्त्व आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सातत्याने काँग्रेस आक्रमक होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार वेगळं समीकरण जुळवतात का असा तर्क लढवला जात आहे.

शरद पवारांचं मोदींना पत्र

दरम्यान, शरद पवारांनी मोदींच्या भेटीत बँकिंग सुधारणा कायद्याबाबत पत्र लिहिलं आहे. सहकार क्षेत्रांतील बदलामुळे सहकारी बँकांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या, सहकारासंबंधी कायद्यांसंबधी बदलांबाबतचे आक्षेप यासंबंधी निवेदन पवारांनी मोदींना दिलं आहे.

सहकार आणि बँकिंग कायद्यातील सुधारणांचं स्वागत आहे. पण अधिनियमातील मूलभूत तरतुदींमध्ये काही विसंगती आहेत. जे विशेषत: 97 व्या घटनादुरुस्तीमध्ये राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकारी तत्त्वांमध्ये आढळतात.

सुधारित कायद्याची उद्दीष्टे चांगल्या हेतूने आहेत. त्यातील बर्‍याच तरतुदी आवश्यक आहेत. बोर्ड आणि व्यवस्थापन निश्चितपणे कठोरपणे कारवाई केली पाहिजे आणि ठेवीदारांचे हित संरक्षित केले पाहिजे.

परंतु त्याच वेळी हे सुनिश्चित केले पाहिजे की असे करताना घटनेत नमूद केलेल्या सहकारी तत्त्वांचा बळी दिला जाऊ नये, असं शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता?, असा सवाल करतानाच पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात. त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदीशरद पवार

संबंधित बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 24, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 24, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तीस दिवसांत पालकांचे घर सोडा! आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा-सून घरात राहू शकत नाहीत; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

June 23, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदय पिळवटणारी घटना! परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत पोटच्या लेकीचा मृत्यू; पप्पा, तुम्ही कलेक्टर झालात का? उलट उत्तर देताच…

June 23, 2025
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

सरकार लाडक्या बहिणींना खुश करणार! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिला मतांवर डोळा; आता लाडक्या बहिणींना मिळणार ९ टक्के व्याजाने ‘इतक्या’ लाखापर्यंत कर्ज

June 22, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

शैतानी वृत्ती! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या; तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक

June 19, 2025
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

बँकेच्या गेटवर गळफास! लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात; चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल

June 19, 2025
Next Post
दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

राज्यात आगामी काही दिवसात असा असणार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 24, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 24, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा