mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विठ्ठल कारखाना चालू होणार! खा.शरद पवार यांनी घातले ‘विठ्ठल’च्या प्रश्नात लक्ष; आज पुण्यात होणार बैठक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 1, 2021
in सोलापूर, राज्य
खा.शरद पवारांच्या आजच्या सरकोली दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष, असा असेल दौरा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

तालुक्याचा आर्थिक कणा आणि शेतकऱ्यांचा राजवाडा अशी ख्याती असलेल्या वेणूनगर-गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

अडीअडचणींबाबत चर्चा करण्यासाठी कारखान्याच्या संचालकांची आज शुक्रवार दि.१ ऑक्टोंबर रोजी पुणे येथे बैठक बोलावली आहे.

शेतकरी, कामगारांची थकीत देणी, नव्याने कर्ज उभारणी, कारखाना चालू करणे, नेतृत्वाच्या अनुषंगाने असलेलीचर्चा आदींविषयी या बैठकीत काय निर्णय होतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा विठ्ठल परिवाराचे मुख्य सत्ताकेंद्र आहे. मात्र, हा कारखाना आर्थिक अडचणींच्या गर्तेत अडकला आहे. गेल्या हंगामात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या कारखान्यास थकहमीसह सर्वतोपरी सहाय्य केले होते.

दरम्यान, तत्कालीन चेअरमन स्व.आ.भारत भालके यांचे आकस्मित निधन झाले आणि एकूणच यंत्रणेची घडी विस्कटली. क्षमतेच्या मानाने अत्यल्प गाळप करून कारखाना बंद झाला.

त्यानंतर कामगारांचे पगार, सभासदांची ‘एफआरपी’, ऊस तोडणी-वाहतुकीची बिले अशी कोट्यवधींची देणी थकली. चेअरमन भगीरथ भालके यांनी कारखान्याच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले.

मात्र,अगोदरच प्रचंड थकबाकी असल्याने यश आलेले नाही. कारखाना प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला असताना ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये तालुक्याच्या ‘राष्ट्रवादी’त बेकी निर्माण झाली आहे. युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने उघडपणे चेअरमन भगीरथ भालके यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

संचालक मंडळातही मतभेद वाढल्याने कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्नही एकजुटीने होणे अवघड होऊन बसले आहे. मागील थकीत देणी आणि कर्जाचा डोंगर असल्यामुळे चालू गळीत हंगाम तोंडावर आला तरी कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने कसल्याच हालचाली दिसत नाहीत.

त्यामुळे सभासद कामगार, विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांसह सर्वच घटकांमध्ये कमालीची अस्वस्थता जाणवत आहे. आजवर विठ्ठल परिवाराला खा.शरद पवार यांनी नेहमीच पाठबळ दिलेले आहे.

अपेक्षेप्रमाणे आताही त्यांनी कारखान्याच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातल्याचे दिसत आहे. चार दिवसांपूर्वी विठ्ठल परिवारातील नेते ‘सहकार शिरोमणी’चे चेअरमन कल्याणराव काळे, ‘भीमा’चे चेअरमन धनंजय महाडिक ‘विठ्ठल’चे चेअरमन भगीरथ भालके यांची बैठक बोलावून चर्चा केल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे खा.पवार यांनी आज शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक पुणे येथे बोलावली आहे. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बैठकीत तरी सकारात्मक निर्णय होऊन मागील देणी आणि चालू हंगामात कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने ठोस तोडगा निघणार का ? याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली आहे.(स्रोत:पुण्यनगरी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल सहकारी साखर कारखानाशरद पवार

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवेढा तालुकाध्यपदी प्रा.पी.बी.पाटील तर शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवेढा तालुकाध्यपदी प्रा.पी.बी.पाटील तर शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा