mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 4, 2022
in राजकारण, राज्य, सोलापूर
शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडी आणि अन्य केंद्रीय तपासयंत्रणाकडून होत असलेल्या कारवाईवरुन राज्यात रणकंदन सुरु आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष ईडी कारवाईवरुन केंद्रातील भाजप सरकारवर थेट निशाणा साधत आहेत.

राज्यात अशी परिस्थिती असली तरीही सोलापुरात सत्तेतील शिवसेना नेत्याने केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माढ्याचे आमदार बबन शिंदे ईडीच्या रडारवर आले आहेत.

आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांची आज ईडीच्या पथकाने पाच तास चौकशी केल्याचं कळतंय. रणजितसिंह शिंदे यांची नुकतीच सोलापूर जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदावर निवड झाली आहे.

साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्याच्या प्रकरणात ईडीने आज शिंदे पिता-पुत्राची चौकशी केल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर बेबनाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

माढा तालुक्यातील नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्याविरुद्ध एका सूतगिरणी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार ईडी, सेबी आणि आयकर विभागाकडे केली होती.

यानंतर संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्या साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल केली होती.

महत्वाची गोष्ट म्हणजे कोकाटे यांनी केवळ तक्रार करुन न थांबता त्याचा पाठपुरावाही केल्यामुळे ईडीने आज सोलापुरात शिंदे पिता-पुत्रांची चौकशी केल्याचं बोललं जातंय.

त्यामुळे भविष्यकाळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून आमदार शिंदे यांनी जवळपास ५०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी केला होता. दरम्यान आमदार शिंदे यांनी ईडीच्या या चौकशीवर काहीही बोलण्यास नकार दिला.

दरम्यान संजय शिंदेविरुद्ध दंड थोपटणाऱ्या कोकाटे यांनी या प्रकरणातील चौकशीचं स्वागत करत भगवान के घर मे देर है अंधेर नही असं म्हटलं आहे.

“विरोधकांवर खोट्या केस करायच्या, त्यांना बदनाम करायचं आणि स्वतः चोऱ्या करुन धर्मात्मा बनायचं हे आता संपलेलं आहे. जनतेच्या जादा उसाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या धंद्यासाठी त्याचा वापर करायचा, शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन कर्ज उचलायचं.

मग ही घेतलेली कर्ज कर्जमाफीच्या प्रक्रियेत बसवायची अशा प्रकारचा भ्रष्टाचार बबन शिंदे आणि रणजित शिंदे यांनी केला आहे. यावर आता न्याय होणार आहे.

प्रसंग आला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयातपर्यंत जाऊ पण शेतकऱ्यांचा जो पैसा आहे तो त्यांना परत देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करु.

शिंदे पिता-पुत्रांना आतापर्यंत तीन नोटीसा बजावण्यात आल्या असून चौथ्या नोटीसीनंतर त्यांना अटकही होऊ शकते”, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ईडीराष्ट्रवादीसोलापूर आमदार

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

September 1, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
Next Post

आ.समाधान आवताडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सरपंचांनी दिला पाणी घेण्यास नकार; पाणीपुरवठा योजनेमधून 'ही' गावे बाहेर पडणार

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा