मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल सोलापूर जिल्हा दौ-यावर आले होते. सोलापूर येथे आयटी पार्कचे उद्घाटन झाल्यानंतर माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरणासाठी सांगोला येथे नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना शरद पवार यांनी मंगळवेढ्यासाठी वेळ काढत अभिजीत पाटील पाटील यांच्या मागे शक्ती उभी करण्याच्या अनुषंगाने मंगळवेढामार्गे सांगोल्याकडे प्रस्थान केले.
मंगळवेढा येथे शरद पवार यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मंगळवेढा कायम शरद पवार यांच्या पाठीशी आहे असा संदेश मंगळवेढेकरांनी दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अभिजीत पाटील यांच्यासाठी शरद पवार यांचा दौरा हा बुस्टर डोस मानला जात आहे.
शरद पवार यांचा सोलापूर येथील कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना आपल्या गाडीत घेऊन मंगळवेढ्याकडे प्रस्थान केले.
साखर कारखानदारीतील आश्वासक चेहरा म्हणून अभिजीत पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्याकडे सहा साखर कारखाने आहेत. सर्व कारखान्याचे व्यवहार अत्यंत पारदर्शी ठेवत त्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले एकदाही थकवली नाहीत. तसेच कामगारांच्या पगारी देखील वेळेवर होत आले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची नजर अभिजीत पाटील यांच्यावर पडली होती.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठी पोकळी निर्माण झाली होती. शरद पवार यांनी भगीरथ भालके हे नेहमीच नॉट रिचेबल असल्यामुळे नव्या नेतृत्वाची शोध सुरू केला होता.
कारखानदारीसह नेतृत्व करण्याची क्षमता असणारा युवक म्हणून अभिजीत पाटील यांच्या पारड्यात शरद पवार यांनी आपले मत झुकवत त्यांना पक्षात घेतले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे.
अभिजीत पाटील यांनी हा डबघाईला आलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवली. कारखानादेखील जोमाने सुरू करून दाखवला तसेच भालके यांच्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत थकवलेले शेतकन्याचे ऊस बील मोळी टाकण्याच्यापूर्वी शेतकन्यांच्या खात्यावर जमा करून कारखाना सुरू करण्याचा इतिहास घडवल्यानंतर शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची उमेदवारीच अभिजीत पाटलांना जाहीर करून टाकली.
अभिजीत पाटील हे मंगळवेढयात कार्यकर्त्यांचा विस्तार करत असताना शरद पवारचा दौरा मंगळवेढा शहरात झाल्यामुळे त्यांना या दौऱ्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. श्री संत दामाजी चौकामध्ये प्रचंड गर्दीमध्ये कार्यकत्यांनी शरद पवार यांच स्वागत करण्यात आले.
मंगळवेढा शहर आणि तालुका हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांचा आजच्या दौरा अभिजीत पाटील यांच्यासाठी बूस्टर डोस मानला जात आहे.
मंगळवेढ्यात कार्यकर्त्यांची नवीन फळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार होत आहे. याचा नक्कीच फायदा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांना होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.(स्रोत; सुराज्य)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज