मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरात वाहन चालक रस्त्यात गाड्या कुठेही उभा करीत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. दरम्यान मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रभारी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी स्विकारल्यानंतर
दि.1 ते 10 ऑगस्ट दरम्यान छोट्या-मोठ्या वाहनावर वाहतूक शाखेच्या पोलीसांनी कारवाई करुन 1 लाख 34 हजार 400 रुपयाचा दंड केवळ दहा दिवसात वसूल केला आहे. दरम्यान या कारवाईमुळे बेशिस्तपणा वाढलेल्या वाहन चालकांना चांगलीच चपराक बसली आहे.
मंगळवेढा शहरात वाहन चालकामध्ये बेशिस्तपणा मोठ्या प्रमाणात वाढला होता. शहरातील मुळात रस्ते हे लहान असून व्यापार्यांनी दुकानाच्यापुढे पार्किंगची व्यवस्था न केल्यामुळे ग्राहकांची आलेली वाहने नाईलाजाने रस्त्यावर लावून खरेदीला जाण्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असे.
आठवडी बाजार दिवशी याचा त्रास नागरिकांना अधिक प्रमाणात सोसावा लागत असे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर शहरातील वाहनधारकावर कारवाईचा बडगा उचलून नियमांचे पालन न करणार्या वाहन चालकावर कारवाई करुन शिस्तीचे पालन करण्यास भाग पाडले आहे.
दरम्यान वाहन चालकांना काही प्रमाणात शिस्त लागत असल्याचे चित्र आहे. पोलीस अधिकारी साटम यांची पोलीस व्हॅन दिसताच वाहन चालक कारवाईच्या भितीपोटी गाड्या घेवून धूम ठोकत असल्याने पोलीसांनी चक्क व्हॅन ऐवजी खाजगी वाहनाचा वापर करुन कारवाई मोहिम सुरु केली आहे.
नित्यनियमाने दररोज सायंकाळी शहराच्या मध्यभागातून पोलीसांची खाजगी गाडी फिरत असल्याने वाहन चालकांना शिस्त लागत आहे. परिणामी दामाजी चौक,शिवप्रेमी चौक,चोखामेळा चौक, मुरलीधर चौक आदी ठिकाणी रस्ते मोकळे झाल्याने सुटसुटीतपणा दिसत आहे.
दामाजी चौकात भररस्त्यावर छोटे-मोठे हातगाडे दिवसभर उभे करत असल्याने ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या करत असल्याचे चित्र होते. या व्यवसायिकांना पोलीस अधिकारी साटम यांनी रस्त्यावर हातगाडे उभे करु नका सक्त सूचना केल्याने ते हातगाडे पाठीमागील बाजूला सरकावल्याने हा चौक येणार्या-जाणार्यासाठी विनाअडथळा ठरला आहे.
या कारवाईत वाहतूक शाखेने रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्या 193 वाहनावर केसेस करुन 1 लाख 15 हजार 500 तर लायसन्स नसणे, सीटबेल्ट न लावणे, ट्रिपल सीट व इतर 28 केसेस करुन 18 हजार 900 इतका दंड वसूल केला आहे. दरम्यान कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
पोलीस अधिकारी साटम ह्या मंगळवेढा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून किमान एक वर्ष रहाव्यात अशा प्रतिक्रिया ही सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत आहेत. या कारवाई मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस नाईक शिवाजी पांढरे,पोलीस अंमलदार प्रविण जाधव, सचिन काळेल सहभागी आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज