टीम मंगळवेढा टाइम्स ।
संपूर्ण जगभरात कोरोनो रोगाचा थैमान माजला असताना केंद्र सरकार मनमानी कारभार करून सामान्य जनतेला आजून जास्त आडचणीत आणण्याचा कुटील डाव आखत आहे.
शेतकरी हिताचे विरोधी कायदा असो किवा इंधन दरवाढ असे अनेक सामान्य जनसामान्यांचे जिवन शैलीचे विरोधात जाचक असे निर्णय घेत आहे.
गेल्या 10 महिन्यापासून कोरोना सारख्या महामारी परिस्थितीत अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. व्यापार धंदयावर गदा आली आहे कामगाराचे हाताला काम नाही कित्येकावर उपासमारीची वेळ आली आहे.
अशातच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ केली आहे याचा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.म्हणून केंद्र सरकारचा निषेध मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने नोंदवत आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला इंधन दरवाढ निर्णय मागे घ्यावा व सामान्यांना होणारा आर्थिक टंचाईचा त्रास कमी करावा यासाठी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल पश्चिम महाराष्ट्र प्रभारी लतीफभाई तांबोळी, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव विजयकुमार खवतोडे, नगरपरिषद मंगळवेढा पक्षनेते अजित जगताप,
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुज्जमिल काझी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप बुरकुल,पदवीधर संघाचे संतोष नागणे, पदवीधर शहराध्यक्ष तुषार हजारे, संभाजी ब्रिगेडचे संदीप फडतरे, सागर केसरे विनायक दत्तू,मनोज माळी, प्रसिद्धी प्रमुख अशोक माने,आफताब घोडके,जमीर इनामदार आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज